आ.सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश; आष्टी,पाटोदा व शिरूर कासार तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला मंजुरी

आ.सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश; आष्टी,पाटोदा व शिरूर कासार तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला मंजुरी
आष्टी (प्रतिनिधी)
सप्टेंबर 2025 मध्ये आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामांना अखेर मंजुरी मिळाली असून,आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येऊन अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांचे भराव वाहून गेले होते. काही ठिकाणी बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. परिणामी शेतजमिनी खरडून गेल्या, सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार सुरेश धस यांनी हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न प्रभावीपणे मांडत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व पुनर्वसन विभागाच्या ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत तसेच नाम फाउंडेशन व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुमारे 1.50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून नदी खोलीकरण, रुंदीकरण, भराव बांधकाम तसेच नुकसानग्रस्त बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
मागील दोन आठवड्यांपासून नाम फाउंडेशन व आ. सुरेश धस मित्र मंडळाच्या माध्यमातून कामांना गती मिळाली असून पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढून हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
आष्टी तालुक्यातील मंजूर बंधारे
देवीनिमगाव को.प.ब. क्र. 1,बेलगाव को.प.ब. क्र. 3,वाकी को.प.ब.वाघळूज को.प.ब. क्र. 2,
वाघळूज को.प.ब. क्र. 3,पाटण को.प.ब. क्र. 1
वाळुंज को.प.ब. क्र. 2,चिखली को.प.ब. क्र. 3
खानापूर को.प.ब.,कर्हेवाडी को.प.ब. क्र. 3,
सुलेमान देवळा को.प.ब.,दौलावडगाव को.प.ब. क्र. 3,पाटोदा तालुक्यातील मंजूर बंधारे,नाळवंडी को.प.ब. क्र. 1,येवलवाडी को.प.ब.,डोंमरी को.प.ब.,नाळवंडी को.प.ब. (दुसरे काम) शिरूर कासार तालुक्यातील मंजूर बंधारे तरडगव्हाण को.प.ब. क्र. 1,झापेवाडी को.प.ब.,शिरापूर धुमाळ को.प.ब. क्र. 1,
वारणी को.प.ब. क्र. 1,कालापुरी (सीना) को.प.ब.,पाडळी को.प.ब. क्र. 1,मानूर को.प.ब. क्र. 1,मानूर को.प.ब. क्र. 2,मानूर को.प.ब. क्र. 3,मानूर सीना बंधारा,रायमोह-नाळवंडी को.प.ब. क्र. 1
या कामांसाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, कार्यकारी अभियंता लंब्बा, नाम फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके, उपअभियंता किरण उदमले तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही कामे वेळेत सुरू झाली असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.
“बंधाऱ्यांची दुरुस्ती, नदी खोलीकरण व भराव बांधकामामुळे सिंचन क्षमता वाढणार असून आगामी काळात हजारो एकर शेतीला याचा लाभ होणार आहे,” अशी भावना परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.



