बीड

मुर्शदपुर येथे कृषी कन्यांचे आगमन 

मुर्शदपुर येथे कृषी कन्यांचे आगमन
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील मुर्शदपुर येथे श्री. छत्रपती शाहू, फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी कृषीकन्यांचे मुर्शदपुर या गावात आगमन झाले आहे. यावेळी  कृषीकन्या  लटपटे प्राप्ती, दिसागज शामल,राऊत रेश्मा,राऊत साक्षी,काटे वैष्णवी,सावंत प्रियदर्शनी यांचे मुर्शदपुर गावातील गावकऱ्यांनी व शेतकरी बांधवांनी स्वागत केले कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  एस. आर. आरसुळ , कृषी कार्यानुभव कार्यक्रम समन्वयक कार्यक्रम अधिकारी प्रा. शिंदे रोहिणी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2026-27अंतर्गत शेतकऱ्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली ह्या कृषीकन्यां 2 महिने शेतकऱ्यांना शेती विषयी मार्गदर्शन करणार आहेत यावेळी गावच्या माननीय  सरपंच सौ. शालन मुळे आणि संदीप चौधरी,अंकुश गरसूळे, योगेश चव्हाण,अप्पासाहेब चव्हाण, राजू चव्हाण, संजय चव्हाण,रूईदास चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, दामोदर चव्हाण, मीरा चव्हाण, अविधा चव्हाण, जोती चव्हाण तसेच इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
Back to top button