मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी कुणबी प्रमाणपत्र निघत नसल्यामुळे एकाची आत्महत्या

कुणबी प्रमाणपत्र निघत नसल्यामुळे एकाची आत्महत्या
मांजरसुंबा प्रतिनिधी – मांजरसुंबा येथील येमपुरे वस्ती येथे राहत असलेले बाबुराव विठ्ठल येमपुरे वय 55 यांचे व त्यांच्या कुटुंबीयातील लोकांचे कुणबी प्रमाणपत्र निघत नसल्याच्या नैराश्यातून काल सकाळी 8 :30 वाजताच्या दरम्यान त्यांच्या स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत अधिक माहिती अशी की मांजरसुंबा येथील येमपुरे वस्ती येथे राहणारे बाबुराव विठ्ठल यमापुरे यांच्या भावकीतल्या सर्व लोकांचे प्रमाणपत्र निघाले आहेत परंतु स्वतः त्यांचे आणि त्यांच्या मुलाचे कुणीबी प्रमाणपत्र वारंवार तहसीलला जाऊनही निघत नसल्यामुळे व पुढे मुलाचं काय होईल या चिंतेतून त्यांनी आज सकाळी ससेवाडी च्या बाजूला असलेल्या त्यांच्या स्वतःच्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली ही माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यानंतर बघायची गर्दी खूप झाली होती, नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व डेड बॉडी पोस्टमार्टम साठी नेकनूर येथील रुग्णालयात पाठवून दिली. कुणबी प्रमाणपत्र निघत नसल्यामुळे आत्महत्या केल्याचे समजताच परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ..



