बीड

समता, बंधुता व न्यायाच्या लढ्याला जनतेचा कौल’ – बौध्दाचार्य बलभीम जावळे

समता, बंधुता व न्यायाच्या लढ्याला जनतेचा कौल’ – बौध्दाचार्य बलभीम जावळे

जामखेड येथील बुद्ध विहारात;विजयी नगरसेवकांचा सन्मान

जामखेड प्रतिनिधी:शहरातील तथागत बुद्ध विहार येथे बौद्धाचार्य बलभीम जावळे (भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर सचिव/संस्कार विभाग तसेच महावितरण कंपनीचे प्रिन्सिपल ऑपरेटर) यांच्या हस्ते व त्यांच्या पत्नी वर्षा जावळे यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक सहा चे नवनिर्वाचित नगरसेवक ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव व नगरसेविका संगिता रामचंद्र भालेराव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

बौद्धाचार्य बलभीम जावळे बोलताना म्हणाले, प्रभाग क्रमांक सहा मधील मतदारांनी ॲड.डॉ.अरुण जाधव व संगीता भालेराव यांच्यावर ठेवलेला विश्वास, हा केवळ विजय नसून समता, बंधुता व न्यायाच्या लढ्याला मतदारांनी कौल
दिला असून लोकशाही ही समाज परिवर्तनाची सर्वात मोठी वाटचाल आहे.नवनिर्वाचित प्रतिनिधींनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून विकास कामे करावी हीच जनता अपेक्षा ठेवते.
यावेळी कुटुंबीयांनीही आनंद व्यक्त केला. बौद्धाचार्य जावळे यांचे चिरंजीव गौरव जावळे व कन्या गौरी जावळे यांनी विजयी उमेदवारांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी गणेश जाधव,सुमित भालेराव,बाळ भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button