बीड

सासवडच्या प्रगतीसाठी सर्वजण एकमताने काम करु -आनंदीकाकी चंदुकाका जगताप

सासवडच्या प्रगतीसाठी सर्वजण एकमताने काम करु -आनंदीकाकी चंदुकाका जगताप

पुरंदर सासवड (प्रतिनिधी):-अनिकेत नितीन काळे

सासवड नगरपालिका सभागृहाची परंपरा उज्ज्वल आहे अनेक मान्यवरांनी या सभागृहात काम केले आहे ही चांगली परंपरा कायम ठेवून आपण सर्वजण एकमताने काम करुन सासवडचा लौकिक वाढवू व नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करु असे प्रतिपादन सासवड नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती.आनंदीकाकी जगताप यांनी केले.
सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांचा सत्कार नगरपालिका सभागृहात करण्यात आला. त्यावेळी आनंदीकाकी जगताप यांनी हे मत व्यक्त केले.
नगरपालिका निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल शासकीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पोलिस निरीक्षक सोनवणे साहेब पत्रकार प्रतिनिधी म्हणून जेष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी नगराध्यक्षा आनंदीकाकी चंदुकाका जगताप मंचावर उपस्थित होते. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुधीरभाऊ गुरव यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक,नागरिक यांच्यातील दुवा म्हणून सासवड शहर पत्रकार संघाचे प्रतिनीधी काम करीत आहेत आपण आता एका प्रभागाचे, एखाद्या पक्षाचे प्रतिनिधी राहिला नसून सर्व नागरिकांचे प्रतिनिधी आहोत या भावनेने काम करावे असे आवाहन पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष हेमंत ताकवले यांनी केले. भाजपा नेते व माजी आमदार संजय चंदुकाका जगताप यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली उपस्थित नगरसेवक पैकी स्मिता उमेश जगताप, स्मिता सुहास जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, बाळासाहेब भिंताडे, मंदार गिरमे मनोहर ज्ञानोबा जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रियंका साकेत जगताप,लिना सौरभ वढणे, माधुरी तेजस राऊत, शिल्पा संदिप जगताप, रत्ना अमोल म्हेत्रे,सोपान एकनाथ रणपिसे, प्रदिप काशिनाथ राऊत, वैभव बबनराव टकले, प्रितम उर्फ पप्पू म्हेत्रे,हेमलता मिलिंद इनामके, शितल प्रवीण भोंडे, दिपाली अक्षराज जगताप उपस्थित होते.
पत्रकार संघाचे सदस्य गणेश मुळीक, संभाजी महामुनी, राजेंद्र बर्गे, जीवन कड, जगदीश शिंदे, सुनील वढणे, तानाजी सातव, संदिप जगताप यांनी नियोजन केले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शेखर वढणे भाजपा शहराध्यक्ष आनंद भैय्या जगताप, साकेत जगताप, मोहनराव चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

Back to top button