बीड
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उपळी हायस्कूलचा दुसरा क्रमांक

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उपळी हायस्कूलचा दुसरा क्रमांक
वडवणी प्रतिनिधी वडवणी तालुक्यातील सर्व माध्यमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी वडवणी येथील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये 53 वे बाल वैज्ञानिक प्रदर्शन 2025 26 भरवण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन वडवणी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी आदरणीय बाबासाहेबजी उजगरे, विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या वडवणीचे केंद्रप्रमुख सैलानी शेख , सय्यद मॅडम तसेच महाराणी ताराबाई शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा आंधळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक लोकमान्य उच्च माध्यमिक विद्यालयाचे श्री.पाटील सर व श्रीमती शेळके मॅडम या प्रदर्शनामध्ये उपळी हायस्कूल चा संघ सहभागी झाला होता. या संघाने हरित ऊर्जा ग्रीन एनर्जी या विषयावर मॉडेल तयार केले होते यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून आपण आपल्या घरातील एसी कुलर फॅन चा वापर ऊर्जा न वापरता कसा करता येईल सौर ऊर्जेच्या आधारे हे दाखवण्यात आले होते या प्रयोगास द्वितीय क्रमांक मिळाला. हा प्रयोग जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पात्र झाला आहे. हा प्रयोग वर्ग नववीतील विद्यार्थी शेख हुजेर हनीफ या विद्यार्थ्याने बनवला त्याबरोबरच प्राथमिक गटातून इचके प्रेमराज बालाजी व कांबळे ज्ञानेश्वर हनुमंत या विद्यार्थ्यांना सुद्धा उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले यास मार्गदर्शन श्री गोरे प्रकाश रामकृष्ण व जाधव वसुवैभव वशिष्ठ या शिक्षकांनी केले. द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल संस्थेचे कोषाध्यक्ष शेख मयूर सर व शाळेचे मुख्याध्यापक भागवतराव बडे सर यांनी विद्यार्थ्यासह मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.


