लिटिल स्टार पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा सप्ताह उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.

महेश पवार सोलापूर
मंगळवार दिनांक 09/12/2025 रोजी लिटिल स्टार पब्लिक स्कूल मंद्रूप येथे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले यंदाचे हे वर्ष क्रीडा सप्ताहाचे 2 रे पर्व आहे.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे अध्यक्ष श्री.आप्पासाहेब काळे सहसचिव श्री.प्रमोद व्हनकोरे लिटिल स्टार पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती.श्रद्धा कोरे,श्री सद्गुरू धुळेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील मॅडम उपस्थित होते. मशाल प्रज्वलित करून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
या सप्ताहामध्ये रनिंग,लेमन स्पून, फ्रॉक जंप, बुक बॅलन्सिंग,म्युसिक चेअर, टू लेग रेस, बॉल कलेकशन, सॅक रेस इत्यादी गेम्स घेण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका स्मिता सुतार यांनी केले. याप्रसंगी श्रीमती श्रद्धा कोरे मॅडम यांनी मुलांना खेळाचा दैनंदिन जीवनात काय फायदा होतो याबद्दल माहिती दिली. त्यानंतर खेळ खेळताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन प्रसन्न झाले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी गण उपस्थित होते.



