बीड

बीडमध्ये “तीन पैशाचा तमाशा” नाटकाचे उत्कृष्ट सादरीकरण

बीडमध्ये “तीन पैशाचा तमाशा” नाटकाचे उत्कृष्ट सादरीकरण

बीड (प्रतिनिधी)दि.८ : बीडच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत
बर्टोल्ट ब्रेक्त (अनुवाद -पू.ल.देशपांडे) लिखीत व असलम युनूस दिग्दर्शीत ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकाचे दि.६ डिसेंबर रोजी उत्कृष्ट सादरीकरण झाले.
भिकाऱ्यांचे सोंग घेऊन व्यवसाय करणारे रॅकेट, गुन्हेगारी, गरीब श्रीमंत दरी, कायद्याचा दुरुपयोग करणारे यावर विनोदी व व्यंगात्मक पद्धतीने भाष्य करणारे हे नाटक असून नेपथ्य, संगीत, प्रकाश, रंगभूषा- वेशभूषा यामुळे प्रेक्षकांना ते भावले असल्याचे कलाकारांनी सांगितले. शहरातील सौ.के.एस.के. महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभागाच्या सहकार्याने हा प्रयोग पार पडल्याचे डॉ. संजय पाटील देवळाणकर यांनी सांगितले. आव्हानात्मक असलेल्या या नाटकासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ.दिपा क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, जागतिक पातळीवरील दर्जेदार नाटके मराठीत अनुवाद होऊन अधिकाधिक नाट्य प्रयोग व्हायला पाहिजे या अनुषंगाने “तीन पैशाचा तमाशा” या नाटकाचे विशेष महत्व असल्याचे दिग्दर्शक असलम युनूस यांनी सांगितले.
चौकट
या नाटकात सहभागी कलावंत
यशराज सवई, अभिषेक इनकर, स्नेहा व्हरकटे, निकीता काशीद, अभिषेक घुले, शैलेश थोरात, सागर धनवे, शुभम पाटोळे, किरण काळे, मिलींद शिवनीकर, कोयल काळे, तनिष्का देवकर, शरद भांगरे, सायली गायकवाड, शिवराज झांबरे, मिलींद शिवनीकर, निखील काकडे, संस्कृती अंधारे, प्रणिता वीर आणि वाल्मीक गाणार यांनी भूमिका केल्या असून तांत्रिक कलावंत म्हणून खालील कलाकारांनी सहभाग नोंदवला. नेपथ्य -अमित गाढे, प्रकाश योजना- अशोक घोलप, अमन तांगडे, संगीत संयोजन- पवन शिंदे, संगीत सहाय्य- आविष्कार क्षीरसागर, ज्ञानेश्वर बिचुकले, तृप्ती दराडे, रंगभूषा आणि वेशभूषा- प्रा.डॉ. संजय पाटील देवळाणकर, रंगमंच व्यवस्था- मिलींद शिवनीकर, कबीर जाधव, सहकार्य डॉ. दुष्यंता रामटेके, प्रा.विजय राख.
Back to top button