बीड

कापूस, सोयाबीन भाववाढ आंदोलन पेटणार! 

कापूस, सोयाबीन भाववाढ आंदोलन पेटणार!
कापूस 10 हजार, सोयाबीन 7हजार भाव द्या
पाली येथे शेतकरी बैठक संपन्न
बीड / प्रतिनिधी : तालुक्यातील पाली येथे सोयाबीन व कापूस हमीभावात वाढ करण्यात यावी या मागणीसह आदी मागण्यासाठी बैठक पार पडली असून या बैठकीत कापसाला दहा हजार व सोयाबीनला सात हजार भाव देण्यात यावा अशी एक मुखी मागणी करण्यात आली.
सध्या जिल्ह्यामध्ये ऊस आंदोलनानंतर कोरडवाहू शेतकरी आता कापूस आणि सोयाबीनच्या दर वाढीसाठी आंदोलनाची जय्यत तयारी करीत आहे या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पाली येथे शिवसंग्राम चे किसान आघाडीचे जिल्हाप्रमुख राजेंद्र आमटे ,आम आदमी पार्टीचे जिल्हाप्रमुख अशोक येडे यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली असून या बैठकीत कापसाला दहा हजार रुपये तर सोयाबीनला सात हजार रुपये हमी भाव प्रतिक्विंटल देण्यात यावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली तसेच कापूस खरेदी केंद्रावर सी सी आय कडून शेतकऱ्याची होणारी पिळोणूक तत्काळ थांबवण्यात यावी अशा अनेक प्रश्नावर या बैठकी चर्चा करण्यात आली या वेळी राजेंद्र आमटे, अशोक येडे, माजी सरपंच लक्ष्मण नवले, संतोष राऊत, संदीप नवले, अनिल साळुंके, दशरथ राऊत, रणजीत गोरे,दत्ता राऊत, राम नवले, विलास पूर्भे, रवींद्र नवले,  ज्ञानेश्वर नवले, भालचंद्र नवले, महेंद्र राऊत, कृष्ण मसुरे, वसंत नवले, विक्रम वाघमारे,कल्याण राऊत, अंबादास राऊत, गणेश राऊत, रवींद्र देशमुख, शिवाजी नवले, दिलीप पुरभे, फकिराव नवले, सपाते बळीराम, रावसाहेब नवले, अशोक राऊत, तुकाराम भातकर , सुरेश पूर्भे, आकाश सपाट बाबू घाडगे, खंडू राऊत, रामेश्वर नवले, शरद नवले, ऋषिकेश चाळक, राऊत बंडू, गणेश नवले, नारायण राऊत, वाघमारे ईश्वर सह आदी उपस्थित होते.
Back to top button