📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सुशिक्षित मुस्लिम मतदार विकासाची संधी सोडणार नाहीत

सुशिक्षित मुस्लिम मतदार विकासाची संधी सोडणार नाहीत
भाजपचे इर्शाद शेख, फारुख शेख यांनी व्यक्त केला विश्वास
बीड दि.३० : बीड शहर आणि जिल्ह्यातील सुशिक्षित मुस्लिम मतदार विकासाला प्राधान्य देणार असून ते कोणत्याही प्रकारच्या अफवांना किंवा दिशाभूल करणाऱ्या राजकारणाला बळी न पडता विकासासाठीच मतदान करतील, असा ठाम विश्वास भाजपच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
भाजपचे शहर अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी इर्शाद शेख आणि फारुख शेख यांनी माहिती देताना सांगितले की, मुस्लिम समाजातील तरुण, व्यापारी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग आज विकासाच्या मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेत आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, घरकुल योजना, उज्ज्वला गॅस, आयुष्मान भारत यासारख्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ मुस्लिम समाजालाही मिळाला आहे. इर्शाद शेख म्हणाले, आजचा मुस्लिम मतदार सुशिक्षित आहे. तो भावनिक नव्हे तर विकासाच्या निकषांवर निर्णय घेणारा मतदार बनला आहे. कोण विकास करतो, कोण योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवतो, हे तो स्पष्टपणे पाहतो आहे. फारुख शेख यांनीही याच भूमिकेची पुनरावृत्ती करत सांगितले की, धर्माच्या आधारावर मत मागण्यापेक्षा रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर मतदान केले जावे, अशी भावना मुस्लिम समाजात वाढत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विकासाच्या बाजूने मत पडणार, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
चौकट
मुस्लिम समाजाचा सकारात्मक सहभाग
भाजपच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अलिकडच्या काळात भाजपच्या योजनांचा लाभ मुस्लिम समाजातील मोठ्या घटकापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे समाजामध्ये सरकारबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून, विकासाची गती कायम राहावी, यासाठी सुशिक्षित मतदार मतदान करताना जबाबदारीने निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Back to top button