श्रीवर्धन येथे सकल मराठा परिवारतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

श्रीवर्धन येथे सकल मराठा परिवारतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
द.जि.रा.प्र.:-(कुणाल माळवदे)
रायगड जिल्ह्यातील सकल मराठा परिवारतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन आज श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात आले. या उपक्रमात एकूण ३० जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सकल मराठा परिवार रायगड समन्वयक सौ. रूपाताई सुखदरे यांनी स.म.प. श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी श्री.शैलेंद्र ठाकूर, श्री.राजेश चव्हाण, श्री.निलेश चव्हाण, श्री.राजेश गोरुले, श्री.अक्षय पवार, कु.रंजिता चव्हाण, सौं.ऐश्वर्या कोसबे, श्री.संतोष सापते इत्यादी च्या सहकार्याने. तसेच एका शब्दाचा अवकाश कीं कामं झाले असे मित्र बंधू श्री.प्रीतम श्रीवर्धनकर, श्री.काशिनाथ गुरव व श्री.आशिष कदम यांचे बहुमोल योगदान मिळाले. सहकार्याने विशेष पुढाकार घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या समन्वयातून व प्रेरणेतून रक्तदान शिबिर सुरळीतपणे पार पडले. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून करण्यात आली.सहभागी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करून गौरविण्यात आले.
या प्रसंगी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, रायगड जिल्हा रक्तपेढी अलिबागचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच स. म. प. चे सदस्य उपस्थित होते.
‘आपल्या रक्ताच्या एका थेंबातून कुणाचं आयुष्य फुलू शकतं’ या घोषवाक्याने प्रेरित या सामाजिक उपक्रमातून मानवतेचा संदेश देण्यात आला. सर्व जाती धर्मातील बंधू-भगिनींनी सहभाग घेऊन शिबिराचे यश अधिक गगनभरारी केले.
सकल मराठा परिवाराकडून सर्व रक्तदात्यांचे तसेच बहुमोल योगदान दिलेल्या प्रत्येक बांधवाचे मनापासून आभार व्यक्त केले आहे.



