पुर्वापारौ वापराचे स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करणार शिगवण बौध्दवाडी ग्रामस्थांची भूमीका

पुर्वापारौ वापराचे स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करणार शिगवण बौध्दवाडी ग्रामस्थांची भूमीका
वादग्रस्त मोबाईल टॉवर हलवण्याच्या प्रशासनाकडून हालचाली
मंडणगड : प्रतिनिधी, दि. 18- शिगवण बौध्दवाडी येथे 17 नोव्हेंबर 2025 रोजी वाडीत मयत झाल्याने बौध्दवाडीचे स्मशानभूमीतच उभ्या करण्यात आलेल्या बी.एस.एन. एल. कंपनीचा मोबाईल टॉवर वाद पुन्हा पुढे आला.
शिगवण बौध्दवाडी येथील ग्रामस्थांनी अंत्यविधीस जागा नसल्याने आम्ही आमच्या पुर्वापार स्मशानभूमीतच मयताचा अंत्यविधी करणार अशी भूमीका घेतली. यामुळे महसुल प्रशासन व बी.एस.एन.एल. कंपनीची चांगलीच धावपळ उडाली. यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या व त्यावर मार्ग काढत 18 नोव्हेंबर 2025 रोजी शिगवण येथील बौध्दवाडीचे स्मशानभूमीत मयत इसमावर जळीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गत दोन वर्षांपासून शिगवण बौध्दवाडीतील ग्रामस्थ
त्यांच्या पिढ्यानपिढ्या वापराच्या स्मशानभूमीत उभा करण्यात आलेला मोबाईल टॉवर तातडीने हटवण्यात यावा या करिता विविध पातळ्यांवर उपोषण व आंदोलने करुन पाठपुरावा करीत होते. मात्र या विषयाशी संबंधीत असलेल्या सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी केवळ पत्र प्रपंच करण्याची भूमीका घेतलेली दिसून आली आहे. दरम्यान (17) नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामस्थांनी आम्हाला दफनविधीसाठी तातडीने जागा उपलब्ध करुन द्या अशी भूमीका घेतल्यानंतर बी.एल. एन. कंपनी मंडणगड कार्यालय यांच्यावतीने ग्रामस्थांना पत्र देण्यात आले. व मोबाईल टॉवर स्थलांतरीत करण्याची प्रकीया सुरु असल्याने शासकीय जागा 1 ब मधील मोबाईल टॉवरच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत ग्रामस्थांनी मयत व्यक्तिचा अंत्यविधी करण्याची विनंती करण्यात आली. याला संमत्ती देऊन बी.एस.एन.एल कार्यालयाचे वतीने विधी करीत असताना शेजारील टॉवरला काही हानी निर्माण झाल्यास त्यास ग्रामस्थ जबाबदार राहणार नसल्याचे कंपनीकडून दिलेल्या पत्रात आश्वस्त करण्यात आले आहे.



