बीड
पुतणीच्या लग्नाला गेलेल्या वृद्धाच्या घरातून ५५ हजारांचा मुद्देमाल गायब

पुतणीच्या लग्नाला गेलेल्या वृद्धाच्या घरातून ५५ हजारांचा मुद्देमाल गायब
दै, सूर्योदय:- साकोली : शहरातील प्रगती कॉलनी येथे घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी आसीफ अजीज शेख (वय ६४) हे दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सांयकाळी ६.३० वाजता ते १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत नागपूर येथे पुतणी अलीना आरिफ शेखच्या लग्नासाठी घराला कुलूप लावून गेले होते.
दरम्यान, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाज्यावरील लॉकची कडी तोडून आत प्रवेश केला. घरात शोधाशोध करून चोरट्याने हॉलमध्ये लावलेला एल.जी कंपनीचा एईडी टीव्ही (किंमत १०,००० रुपये), लोखंडी अलमारीतील प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले ३५,००० रुपये, तसेच सहा तोळ्यांची चांदीची पायपट्टी (किंमत ५,००० रुपये) आणि ५,००० रुपये रोख असा एकूण ५५,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी फियांदी आसीफ शेख यांच्या तक्रारीवरून पोस्टे साकोली येथे अप. क्र. ६२५/२५, कलम ३३१(३)(४), ३०५(अ) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील तपास पोउपनी प्रशांत वडुले (मो. ९८२३०६८५९३) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
साकोलीत वाढत्या घरफोड्यांच्या घटना पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


