बीड

कार्तिकी पौर्णिमेला कपिलधारात लाखो भाविकांची गर्दी

कार्तिकी पौर्णिमेला कपिलधारात लाखो भाविकांची गर्दी

बारामती ॲग्रो लिमिटेडच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या हस्ते आरती

जामखेड प्रतिनिधी : कार्तिकी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी श्री क्षेत्र कपिलधारा (जि. बीड) येथे आयोजित श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज दिव्यज्ञान प्राप्ती सोहळ्यास कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री तसेच बारामती ॲग्रो लिमिटेडच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी उपस्थित राहून समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरतीही करण्यात आली.

संत मन्मथस्वामी महाराज हे १३व्या शतकातील समाजजागृतीचा दीप प्रज्वलित करणारे समाज कार्यातील थोर संत मानले जातात. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी साजरा होणाऱ्या या औचित्यपूर्ण सोहळ्याची परंपरा तब्बल ७० वर्षांपासून अखंड सुरू असून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटकातून लाखो भाविक कपिलधार येथे येऊन या दिव्य पर्वात सहभागी होतात.

या प्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, श्री क्षेत्र कपिलधार देवस्थान पंचकमिटी अध्यक्ष सोमनाथ हलगे, बाळासाहेब मिटकरी, नागेश मिटकरी, अशोक शहागडकर, शिवा भुरे, संजय घाळे, विजयसिंह गोलेकर, युवा नेते अमोल लोहकरे, सामाजिक कार्यकर्ते अभय शिंगवी, रामहरी गोपाळघरे, गणेश ढगे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य भाविक उपस्थित होते.

Back to top button