अबॅकस स्पर्धेत सुवर्ण; सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते श्रावणी कुलकर्णीचा सन्मान

अबॅकस स्पर्धेत सुवर्ण; सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते श्रावणी कुलकर्णीचा सन्मान
जामखेड प्रतिनिधी – धाराशिव येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मेट्रो ट्रेन अबॅकस स्पर्धेत जामखेड येथील विद्याभारती क्लासेसची विद्यार्थिनी श्रावणी विजय कुलकर्णी हिने झेड गटात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी श्रावणीचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शहरमंडल अध्यक्ष संजय(काका)काशिद, शक्ति प्रमुख मोहन (मामा) गडदे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, शिवकुमार डोंगरे, विजय कुलकर्णी, ऋषिकेश खरात, तुषार बोथरा आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे यांनी श्रावणीचे कौतुक करत सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणे अभिमानास्पद आहे. तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.



