गेवराई नगरपरिषद मध्ये महिला राज कोण होणार नगराध्यक्ष चर्चेला उधाण

गिताभाभी पवार, गिरीकाभाभी पंडित, शितलताई दाभाडे, रेवती घुंबाडेॅ व कालींदात आतकरे यांच्या नावाची चर्चा
गेवराई (अंकुश आतकरे) गेवराई नगर परिषदचे नगराध्यक्षपद सर्व साधारण महिलेस सुटल्याने नगरपरिषदवर महिला राज येणार असून, कोण नगराध्यक्ष होणार ? कोणत्या पक्षाचे पारडे जड आशा उलट सुलट चचेॅला शहरात उधान आले आहे. तगडी फाईट होणार असल्याचे बोलले जात आहे.
गेवराई नगरपरिषदचा आतापर्यंतचा ईतिहास आहे कि, जो होणार आमदार त्याचाच होणार नगराध्यक्ष त्यामुळे या वेळेस परिवर्तन होणार का ? नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेस सुटल्याने गेवराई नगरपरिषदवर महिला राज येणार असुन, नागरिकांत तर्क वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. एकंदरी पाहता यावेळेस तिन्ही नेत्यांकडे तगडे उमेदवार आहेत त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तगडी फाईट होणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या पत्नी गिरीकाभाभी पंडित, युवा नेते बाळराजे पवार यांच्या पत्नी गीताभाभी पवार, मा. नगराध्यक्ष महेश अण्णा दाभाडे यांच्या पत्नी शितलताई दाभाडे, अँड.भगवान घुंबार्डे यांच्या पत्नी मा.नगरसेवक रेवती भगवानराव घुंबार्डे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक तात्या आतकरे यांच्या पत्नी कालींदात आतकरे यांच्या नावाची चर्चा शहरात सुरू असून, गिरीकाभाभी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून निवडणूक लढवणार तर शितलताई महेश दाभाडे व कालींदा आतकरे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट यांच्याकडून मा.आमदार अमरसिंह पंडित व आ.विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार असून गीताभाभी पवार व रेवती घूंबार्डे ह्या भाजप या चिन्हावर निवडणूक लढवणार की, बाळराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष पॅनल मधून निवडणुका लढवणार? आशी चर्चा शहरात सुरू असून येवू घातलेल्या नगरपरिषद निवडणूकीत रस्सीखेच होणार असून काट्याची टक्कर होणार असल्याचे बोलले शहरात जात आहे.



