संपादकीय

गेवराईत रंगला कृष्ण जन्माचा सोहळा

शिवाजीराव पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भागवत कथेस उस्फूर्त प्रतिसाद

================

गेवराई दि.५ (प्रतिनिधी) माजी मंत्री शिवाजीराव (दादा)पंडित यांच्या ८८ व्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त गेवराई शहरांमध्ये आयोजित केलेल्या भागवत कथेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांनी आपल्या मधुर वाणीतून कथा सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहेत.  भागवत कथे बरोबरच सायंकाळच्या सत्रामध्ये संगीत भजन आणि रात्री कीर्तनालाही भाविक भक्त उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून शिवाजीराव (दादा) पंडित अभिष्टचिंतन सोहळ्याचे पदाधिकारी कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. आज शिवनगरीत कृष्ण जन्माचा सोहळा रंगला. उपस्थित भाविक भक्तांनी यावेळी आनंद साजरा केला.

गेवराई शहरातील र.भ. अट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या शिवनगरीत भागवत कथा सुरू असून भागवताचार्य समाधान महाराज शर्मा आपल्या मधूर वाणीतून भगवत कथा कथन करत आहेत. कथा श्रवण करण्यासाठी महिला व पुरुष भाविकभक्त  प्रचंड गर्दी करत आहेत. सोहळा समितीचे पदाधिकारी पदाधिकारी अभिष्टचिंतन सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. किर्तन महोत्सवाला माजी मंत्री शिवाजीराव पंडित, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित, शिवशारदा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित, आ. विजयसिंह पंडित यांची उपस्थिती लाभत आहे.

रविवारी सायंकाळच्या सत्रात सुप्रसिद राष्ट्रीय गायक पंडीत रमाकांतजी गायकवाड यांचे शास्त्रीय उपशास्त्रीय अभंग गायन तर  रात्री ह.भ.प.कीर्तनकेसरी सागर महाराज बोराटे यांचे सुश्राव्य हरिकीर्तन झाले. यावेळी अभिष्टचिंतन सोहळा समितीचे पदाधिकारी, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button