संपादकीय
प्राचार्य मधुकर गायकवाड यांच्यावतीने कृतज्ञता सोहळयाचे आयोजन

- मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार समारंभ _पाच आजी-माजी कुलगुरुंची उपस्थिती अंबाजोगाई प्रतिनिधी,बालाजी देशमुख दि.२ : कळंब तालुक्यातील सौंदणा आंबा येथील रहिवाशी माजी कुलगुरु, प्राचार्य मधुकरराव गायकवाड यांच्यावतीने येत्या रविवारी (दि.पाच ) कृतज्ञता सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव तथा अधिसभा सदस्य डॉ.नरेंद्र काळे यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माजी कार्यकारिणी सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु म्हणूनही प्राचार्य गायकवाड यांनी काम केले आहे. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त येत्या रविवारी महाराष्ट्र विद्यालय, बनसारोळा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास पदवीधर आमदार मा.सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे यांचीही उपस्थिती राहील. तसेच माजी कुलगुरु डॉ.एन.व्ही.कल्याणकर (गडचिरोली), डॉ.देवानंद शिंदे (कोल्हापूर), डॉ.उध्दव भोसले, डॉ.के.एम.कुलकर्णी या माजी कुलगुरूसह एनसाई ग्रुपचे संस्थापक बी.बी.ठोंबरे, संचालक ज्ञानेश्वर काळदाते, संस्थाध्यक्ष भागवतराव गोरे यांची उपस्थिती राहील. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य मधुकर गायकवाड, बाबासाहेब, निळकंठ व विजय गायकवाड यांची केले आहे.



