बीड

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी नागरिकांच्या मदतीसाठी सहाय्यता समिती स्थापन करणार–आ.सुरेश धस

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी नागरिकांच्या मदतीसाठी सहाय्यता समिती स्थापन करणार–आ.सुरेश धस
आष्टी ( प्रतिनिधी ) आष्टी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत..आष्टी,पाटोदा आणि शिरूर (कासार) शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला असून त्यांचे भूत न भूतो न भविष्यती नुकसान झाले आहे त्यामुळे या अस्मानी संकटामुळे बाधित झालेल्या सर्वसामान्य नागरिक शेतकरी शेतमजूर यांच्या कुटुंबीयांचे आगामी सहा महिन्याकरता मदत करण्याचा आमचा उद्देश असून यासाठी समाजातील सर्वसमावेशक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली याबाबत अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की हवामानातील अचानक बदलामुळे झालेल्या अतिवृष्टी मुळे आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील शेतकरी यांच्या शेतीचे घरांचे पिकांचे कांदा चाळीचे नुकसान झाले असून सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे या अस्मानी संकटामुळे त्यांचे न भूतो न भविष्यती नुकसान झालेले आहे काही शेतकऱ्यांना एक गुंठा ही जमीन शेती योग्य राहिली नसून यावर्षी खरीप हंगामामध्ये त्यांना उत्पन्न मिळणार नाही सद्यस्थितीमध्ये तात्पुरती मदत म्हणून अनेक संस्था अनेक सेवाभावी संस्था यांचे वतीने मदत कार्य सुरू आहे परंतु ही व्यवस्था तत्पुरत्या स्वरूपात करण्याऐवजी या पूरग्रस्त अतिवृष्टी ग्रस्त बाधित कुटुंबीयांना आगामी सहा महिन्यापर्यंत सहाय्यता देण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन व्यापक स्वरूपात अर्थसहाय मदत रूपाने गोळा करावी लागणार आहे या मदत कार्यासाठी सर्वसमावेशक सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून आष्टी,पाटोदा,आणि शिरूर (कासार) तालुक्यातील विविध संस्था, पतसंस्था, सेवाभावी संस्था, विश्वस्त संस्था, देवस्थान, शासकीय कर्मचारी, पदाधिकारी व्यापारी, यांचेकडून ऐच्छिक स्वरूपात मदत मिळावी अशी अपेक्षा असून या प्रक्रियेमध्ये जी संस्था अथवा व्यक्ती सर्वोच्च अर्थसहाय्य जाहीर करील त्यापेक्षा ज्यादा माझी वैयक्तिक मदत त्यामध्ये असणार आहे या सर्व मदत कार्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी या समितीचे गठन करण्यात येणार आहे आज याबाबत चर्चा केली असता श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव 21 लक्ष रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती पाच लाख रुपये आष्टी तालुका दूध उत्पादक संघ पाच लक्ष रुपये धनश्री सहकारी पतसंस्था एक लक्ष रुपये अशा प्रकारे आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे ज्या दानशूर व्यक्तींना या सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी यथाशक्ती अर्थसहाय्य करून या मदत यज्ञामध्ये आपला सहभाग असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे

Back to top button