बीड
हिवरसिंगा नदीवर 3 ठिकाणी नळकांडी पुल उभारा-ग्रामस्थ

हिवरसिंगा नदीवर 3 ठिकाणी नळकांडी पुल उभारा-ग्रामस्थ
(आ.संदीप श्रीरसागर यांना ग्रामस्थांचे निवेदन)
(शिरूर प्रतिनिधी):- अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी बीड विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप श्रीरसागर शिरुर तालुक्यातील मौ.हिवरसिंगा नदी क्षेत्रावर प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने श्री.विश्वांभर शिंदे,श्री.माऊली शिंदे,श्री.शिवराम राऊत सह ग्रामस्थ शेतकरी यांनी निवेदन देण्यात आले. हिवरसिंगा नदी ते कुटे वस्ती दरम्यान लक्ष्मीआई मंदीर वस्ती,शिंदे तिंकांडे वस्ती,कुटे-बडे वस्ती जवळ नदीवर पूल उभारण्याची आवश्यकता आहे.या पूला अभावी देवकर-नांगरे वस्ती,दुधाळ वस्ती, सानपवस्ती, शिंदे-तिंकाडे वस्ती,संतवामनभाऊ नगर वस्ती,मुस्लीम वस्ती,कुटे-बडे वस्ती,खंडोबा वस्ती वरील किमान ६०% पेक्षा अधिक ग्रामस्थ,शेतकरी,विद्यार्थी,महिला यांची रहदारी आसल्याने तसेच पावसाळ्यात नदीच्या पाण्यामुळे वृद्ध,रूग्ण,विद्यार्थी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने अनेक वर्षापासुन प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील नदीवरील पुल उभारण्यात आले नसल्याने रहिवासी यांनी प्रचंड त्रास सहन करत असल्याने आमदार महोदयांनी प्रत्यक्ष नदी क्षेत्रावर जाऊन पुलाची आवश्यकता समजाऊन घेतली.व लवकरच पुल मंजूरीसाठी प्रयत्न चालू करण्याचे यंत्रणेला आदेश दिले.तसेच शिवश्री कृषि मंडळ यांच्या वतीने देखील अतिवृष्टीने झालेले नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहिर करणे व पीकविमा संबंधातील जाचक अटि वगळून मंजुर करण्याचे शासनाकडे शिफारस करावी करिता निवेदन दिले. यावेळी श्री.सुरेश घोळवे (तहसिलदार) इंजि.संदिपान शिंदे, श्री.बागलाने (गटविकास अधिकारी) श्री.येवले (उपअभियंता) श्री.राजेद्र मस्के (जिल्हाअध्यक्ष) श्री.मदन सर (मा.जि.प.सदस्य). श्री.वैजिनाथ नाना तांदळे,श्री.ज्ञानदेव सानप (मा.पं.स.सदस्य),दत्तात्रय शिंदे (मा.सरपंच) मंडळाधिकारी सानप,तलाठी गणेश बडे, मान्यवरांसह संदिपान सानप,लहू नांगरे,राहुल सानप,सतिश कुटे,लखन सानप,सह ग्रामस्थांची उपस्थिती होती.



