सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मराठा महासंघाचे योगदान अधोरेखित

सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मराठा महासंघाचे योगदान अधोरेखित
पुणे / प्रतिनिधी:-अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे विभागीय अध्यात्म आणि वारकरी आढळा आयोजित व संत तुकाराम महाराज सामाजिक-आध्यात्मिक प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने स्व. जगन्नाथ सिताराम शेंडे पाटील यांच्या ५व्या पुण्यस्मरणानिमित्त गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजकारण, शिक्षण, आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थितीत ह.भ.प. बापूसाहेब महाराज मोरे, ह.भ.प. नारायण जाधव, योगी निरंजन माठे आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. दिलीप दादा नावलकर यांनी भूषविले. समाजातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना सत्कार करून प्रेरणादायी कार्याची दखल घेतली गेली.दरम्यान, शतकांतर शौर्य महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे पुणे जिल्ह्यातील आंबवडे (ता. खे.ड.) येथील अजीत सुरेशराव वडगावकर यांना “मराठा भूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला. शिस्त, परिश्रम, ध्यास गुणवत्ता व सामाजिक जाण ठेवून शैक्षणिक, कला, क्रीडा या क्षेत्रात त्यांनी गाठलेले यश समाजासाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.या दोन्ही उपक्रमांमुळे मराठा महासंघाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक योगदानाची ठळक नोंद झाली असून, नव्या पिढीला प्रेरणादायी संदेश मिळाला आहे.



