चैतन्य वाव्हळचा धाडसी निर्णय तरुणांसाठी प्रेरणादायी – नगरसेवक मोहन पवार यांचे गौरवोद्गार

चैतन्य वाव्हळचा धाडसी निर्णय तरुणांसाठी प्रेरणादायी – नगरसेवक मोहन पवार यांचे गौरवोद्गार
जामखेड – आकाश जिंकायचं धाडस दाखवलं की यशाची दारे उघडतात. जामखेडचा चैतन्य वाव्हळ हे त्याचं जिवंत उदाहरण आहे, असे गौरवोद्गार भाजपचे युवा नेते तथा नगरसेवक मोहन पवार यांनी काढले.
नगरसेविका विद्याताई राजेश वाव्हळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते राजेश वाव्हळ यांचा पुतण्या व पंचायत समितीतील अधिकारी नितीन वाव्हळ यांचा चिरंजीव चैतन्य वाव्हळ नुकताच आफ्रिकेतील केपटाऊन येथे दोन वर्षांच्या कमर्शियल पायलट प्रशिक्षणासाठी रवाना झाला. परंपरागत करिअरची वाट न निवडता विमानक्षेत्र गाठण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मोहन पवार यांनी त्याचे विशेष कौतुक केले.
आपल्या प्रभागातील विकासकामांबरोबरच आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे यांसारखे उपक्रम राबवणारे नगरसेवक मोहन पवार समाजातील नव्या पिढीला नेहमीच प्रोत्साहन देतात. चैतन्यचे हे धाडस आजच्या तरुणाईला मोठे स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारे आहे. जामखेडसाठी हा अभिमानाचा क्षण आहे, असे ते म्हणाले.



