बीड

विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम दक्ष ओईएस कौन्सलिंग करत आहे – डॉ.सुनिल बोराडे

विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम दक्ष ओईएस कौन्सलिंग करत आहे – डॉ.सुनिल बोराडे

दक्ष ओईएस कौन्सलिंगतर्फे एमबीबीएस, बीडीएस निवड विद्यार्थ्यांचा सत्कार

जामखेड – शहरातील तपनेश्वर येथील दशरथ बिरंगळ यांच्या दक्ष ओईएस कौन्सलिंगच्या माध्यमातून एमबीबीएस व बीडीएससाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बोराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्नन केले.

यावेळी ते म्हणाले, एमबीबीएस, बीडीएससह कोणत्याही क्षेत्रात विद्यार्थ्यांना उत्तुंग भरारी देण्याचे व योग्य दिशा देण्याचे काम दक्ष ओईएस कौन्सलिंगचे संचालक दशरथ बिरंगळ व शिवाजी काळदाते करत आहेत.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रा. सुनील नारके, डॉ. अभिजीत हराळे, सेंचुरी कॉम्प्युटरचे संचालक शिवाजी काळदाते, दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. बोराडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमचे विचार चांगले ठेवा. पैसा मिळवता येतो, पण ज्ञान व विचार यांमुळेच खरी समाधानाची प्राप्ती होते. डिग्रीपेक्षा विचार श्रेष्ठ आहेत. इतरांचे जीव वाचवणे हेच खरे पुण्य आहे.यावेळी त्यांनी मुलींच्या शैक्षणिक प्रगतीचे विशेष कौतुक केले.जामखेडसारख्या ग्रामीण भागातूनही मुली शिक्षणाच्या माध्यमातून भरारी घेत आहेत. सध्या शिक्षणात मुलींचा सहभाग तब्बल ६७% आहे, हे अभिमानास्पद आहे,असे ते म्हणाले.
तांबरे आनंद (जिएमसी,मुंबई,जे.जे. काॅलेज, एमबीबीएस), मिसाळ वनश्री(जिएमसी, जळगाव, एमबीबीएस),धस अंकिता (जिएमसी, बारामती, एमबीबीएस), पठाण कासफ(जिएमसी , सातारा, एमबीबीएस), शेख मुस्कान (व्हि.डी.जिएमसी,लातुर, एमबीबीएस), बोराडे सोहम (एस.के.एन,एम.सी.पुणे, एमबीबीएस), गिते सुदर्शन (जिएमसी,धाराशिव,एमबीबीएस),कडू सार्थक(जिएमसी,जळगाव,एमबीबीएस),ढाळे प्रियांका (पी.आय.एम.एस,इस्लामपूर,एमबीबीएस),नागवडे स्नेहा (एक.सी.पि.एम,एम.सी.धुळे, एमबीबीएस),काळदाते प्रतिक्षा( आदित्य काॅलेज,बीड),भोगील धनंजय (सी.एस.एम.एम.एस, संभाजीनगर,बीडीएस), घोडके सृष्टी (एम.जी.व्हि.एम,डि.सी.नाशिक,बीडीएस), हजारे दिपाली (एस.एम.बी.टी.डि.सी.नाशिक,बीडीएस), काळे सायली (योगिता,डि.सी.,खेड,बीडीएस), पांढरे अश्विनी (वाय.सी.एम.अहिल्यानगर,बीडीएस), पवार आकांक्षा (वाय.सी.एम.अहिल्यानगर,बीडीएस) या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत यश संपादन करत आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित उबाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दशरथ बिरंगळ यांनी मानले.

Back to top button