बीड
माजी राज्यमंत्री बदामराव पंडितांच्या उपस्थितीत आज खांडवीत सेवापूर्ती गौरव सोहळा

माजी राज्यमंत्री बदामराव पंडितांच्या उपस्थितीत
आज खांडवीत सेवापूर्ती गौरव सोहळा
अर्जुन धुमाळ, महादेव डोंगरे यांचा होणार सत्कार
गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील शोभादेवी महिला सेवाभावी संस्था संचलित अहिल्याबाई होळकर विद्यालय खांडवी येथे कार्यरत असलेले अर्जुन माणिकराव धुमाळ आणि महादेव रुस्तुमराव डोंगरे या दोन्ही विद्यार्थीप्रिय शिक्षकांच्या सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे आज खांडवी येथे आयोजन करण्यात आले असून शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते दोघांचाही हृदयसत्कार करण्यात येणार आहे.
अहिल्याबाई होळकर विद्यालय खांडवी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अर्जुन माणिकराव धुमाळ हे राक्षसभुवन शनीचे येथील रहिवासी असून महादेव रुस्तुमराव डोंगरे हे काजळा येथील रहिवासी आहेत. दोघांनीही वयाची 58 वर्ष पूर्ण केल्याने त्यांच्या शिक्षक म्हणून सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्याचे आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता अहिल्याबाई होळकर विद्यालय खांडवी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शोभादेवी महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सौ गिरीकाभाभी पंडित, जिल्हा परिषदचे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजीत पंडित, शोभादेवी महिला सेवाभावी संस्थेच्या सचिव सौ अनुरूपाताई पंडित, युवानेते रोहित पंडित, युवानेते यशराज पंडित, निवृत्त अधीक्षक अभियंता परिमंडळ पुणे बी एन बहिर, समाज कल्याण अधिकारी पुणे राधाकिसन देवडे, रवींद्र सुपेकर, इंजिनियर प्रदीप बहिर, शोभादेवी महिला सेवाभावी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याध्यापक प्रमोद देसले यांच्यासह कांतराव शिंदे, कैलास शिंदे, सरपंच गोपाळ शिंदे, चत्रपूर नाईकवाडे, भैय्या भोले, अंकुश पवार, विनायक चव्हाण, ताराचंद चव्हाण, डॉ श्याम निर्मळ, मुख्याध्यापक अमोल राजापूरकर, मुख्याध्यापक दीपक गरुड, मुख्याध्यापक जुगदार, मुख्याध्यापक अविनाश पंडित मुख्याध्यापक जे एन जाधव, मुख्याध्यापक भिलारे सर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अहिल्याबाई होळकर विद्यालयाचे मुख्याध्यापक केशव तळेकर यांच्यासह शिक्षक व स्वागत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.



