बीड
अवैध जुगारावर पोलिसांचा छापा: , तब्बल २ लाख २४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध जुगारावर पोलिसांचा छापा: , तब्बल २ लाख २४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
दै,सूर्योदय:- भंडारा जिल्ह्याच्या सिहोरा तालुक्यात पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल २ लाख २४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक जण फरार झाला आहे.
भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या माहितीनुसार, सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिहोरा शेतशिवारात मंगळवार, दिनांक ८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार पटोले, पोलीस नाईक भानारकर आणि पोलीस शिपाई ढबाले यांच्या पथकाने तुमसर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केली.
या छाप्यात विष्णु श्रीराम निकुळे (वय ३३, रा. सिहोरा), परमानंद लाखन भगत (वय ४५, रा. हरदोली, ता. तुमसर) आणि ओंकार घनशाम तितीरमारे (वय २७, रा. टेमनी, ता. तुमसर) यांना ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. बादल दिनेश सरोदे (वय २४, रा. सोनेगाव, ता. तुमसर) हा आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच फरार झाला.
पोलिसांनी आरोपींकडून आणि घटनास्थळावरून खालील मुद्देमाल जप्त केला:-
विष्णु निकुळे याच्याकडून ३०० रुपये रोख आणि २०,००० रुपये किमतीचा व्हिवो वाय७५ (Vivo Y75) मोबाईल.
परमानंद भगत याच्याकडून २०० रुपये रोख आणि १८,००० रुपये किमतीचा सॅमसंग आरएक्सएम२०३० (Samsung RXM2030) मोबाईल. ओंकार तितीरमारे याच्याकडून २०० रुपये रोख आणि २५,००० रुपये किमतीचा ओप्पो रेनो ७ प्रो (OPPO Reno 7PRO) मोबाईल.
घटनास्थळावरील खुल्या झोपडीतून २०० रुपये किमतीच्या प्लास्टीकच्या चार चटया आणि एक ब्लँकेट.
५० रुपये किमतीचे ५२ तासपत्ते.
२०,००० रुपये किमतीचा एक काळ्या रंगाचा सॅमसंग मोबाईल.
दोन टीव्हीएस स्टार सिटी (TVS Star City) कंपनीच्या मोटरसायकली (एमएच-३६ एम-७९४७ आणि एमएच-३६ क्यू-२४७८) प्रत्येकी ७०,००० रुपये किमतीच्या.
जुगाराच्या अड्ड्यावर असलेले ५०० रुपये रोख.
जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत २,२४,४५० रुपये आहे. याप्रकरणी सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. १७४/२०२५ कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि पोलीस निरीक्षक कसोधन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इळपाते (ब.नं. ९८९) यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सिहोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.



