बीड

लग्नाचे आमिष  दाखवून वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता. 

लग्नाचे आमिष  दाखवून वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता.
 अँड. शरद गोरखनाथ  तिपाले
 सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीच्या सांगण्यानुसार दिनांक 3 -11 -2021 रोजी पीडिते ने आष्टी पोलीस स्टेशन येथे येऊन गुन्हा नंबर 319/ 2021 नुसार भारतीय दंड संहिता कलम 376, 376 (2 )(n ) 504, नुसार फिर्याद दिली की,दिनांक 1-1- 2020 रोजी पुणे येथील शेजारी राहणाऱ्या गायकवाड काकू यांची मुलगी प्रियंका गायकवाड हिच्या लग्नासाठी कडा तालुका आष्टी येथे आले त्यावेळी  माझी  ओळख आरोपी नामे तुषार आडागळे याच्यासोबत झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व त्यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी लॉज वरती व समुद्रकिनारी फिरायला नेऊन तेथे आरोपीने वारंवार बलात्कार केला अशा आशयाची तक्रार पीडितेने दिल्यानंतर सदरील गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा. प्रमुख सत्र न्यायाधीश साहेब बीड यांच्या न्यायालयात सेशन केस नंबर 84 /22 नुसार सदरील प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. सरकार पक्षातर्फे  तीन साक्षीदार, डॉक्टर, व तपासी अंमलदार यांच्या साक्ष झाल्या.सदरील केस मध्ये आरोपी तर्फे अँड शरद जी तिपाले यांनी कोर्ट कामकाज पाहिले व साक्षीदारांचे उलट तपास घेतले व मुद्देसूद व कायदेशीर युक्तिवाद केला, अँड शरद तिपाले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून, आरोपीस
 मा. विशेष सत्र न्यायाधीश साहेब बीड यांनी  आरोपी तुषार आडगळे यांची सदरील आरोपा तुन निर्दोष मुक्तता केली.
Back to top button