बीड

पहिल्याच पावसाने नवीन पूल वाहून गेला

पहिल्याच पावसाने नवीन पूल वाहून गेला
दै,सूर्योदय:-बेसा-बेलतरोडी नगर पंचायत अंतर्गत मागील वर्षी बांधण्यात आलेला नवीन पूल पहिल्याच पावसात वाहून गेला आहे, पुलावरून जोराने धोकादायक पाणी वाहत आहे. सदर पूल हा वेळा-हरिश्चंद्र व बेलतरोडी या गावांना जोडणारा पूल असून याच पुलाजवळ संचेती इंग्रजी शाळा आहे., त्यामुळे कर्मचारी व विद्यार्थ्यांची रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. गेल्या वर्षी याच नवीन पुलावर शाळेच्या मुलांची व्हैन उलटली होती व अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. सदर व्हैमध्ये पोदार शाळेचेही काही विदार्थी होते. त्यावेळी पुलाची थातूर मातुर डागडुजी केली गेली होती, परंतु यंदाच्या पहिल्याच पावसात पूल पूर्णत वाहून गेला असून सर्व बाजूने पुलाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटलेला असून विद्यार्थी,पालक, कर्मचारी यांना धोका निर्माण झालेला आहे. पुलाच्या दोन्ही सुरक्षा कडा पडलेल्या आहेत. पूल धोकादायक असल्यामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे टाळत आहेत. तसेच नागरिक, वाहनधारक वळणाच्या पर्यायी लांब रस्त्यावरून जात आहेत. संबंधित प्रशासनाने सदर पूल तातडीने दुरुस्त करून नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Back to top button