बीड

जामखेडमध्ये महाराजस्व समाधान शिबिरात ८०० नागरिकांना १८ योजनांचा लाभ

जामखेडमध्ये महाराजस्व समाधान शिबिरात ८०० नागरिकांना १८ योजनांचा लाभ
तहसील कार्यालय व ग्रामीण विकास केंद्रच्या संयुक्त उपक्रमातून शिबिर यशस्वी
जामखेड प्रतिनिधी – जामखेड येथे तहसील कार्यालय व ग्रामीण विकास केंद्रच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न झाले. शिबिरात १८ शासकीय योजनांचा लाभ सुमारे ८०० नागरिकांना देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, सहाय्यक आयुक्त विनोद लोंढे, तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, गटविकास अधिकारी शुभम जाधव, मुख्याधिकारी अजय साळवे,ग्रामीण विकास केंद्र चे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. अरुण जाधव, सरपंच संजिवनी पाटील,नय्युमभाई सुभेदार आदी मान्यवर उपस्थित होते.
या अभियानात जात प्रमाणपत्र १८६, ओळखपत्र २००, शिधापत्रिका १००, घरकुल ४६, कृषी, आरोग्य, अपघात विमा, महिला व बालविकास आदी योजनांचे लाभ वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण विकास केंद्र चे संचालक बापूसाहेब ओहोळ, विशाल पवार, सचिन भिंगारदिवे, संतोष चव्हाण,ऋषिकेश गायकवाड, राजू शिंदे, रजनी बागवान, उर्मिला कवडे, मनीषा शिंगणे, ललिता पवार आदी प्रशासकीय अधिकारी , कर्मचारी तसेच ग्रामीण विकास केंद्र चे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
Back to top button