बीड

हिवरसिंग्यात अज्ञाताने उपटली सरकी  शेकऱ्याचे चार हजारांचे नुकसान 

हिवरसिंग्यात अज्ञाताने उपटली सरकी
शेकऱ्याचे चार हजारांचे नुकसान
शिरूर कासार दि.३० (प्रतिनिधी):तालुक्यातील हिवरसिंगा येथील कुटे लक्ष्मण या शेतकऱ्याची एक एक्कर मधील सरकी शुक्रवार (दि.२८) रोजी रात्री अज्ञाताने उपटली असून जवळपास ४ हजारांचे नुकसान यामध्ये झाले असून अज्ञात आरोपी विरोधात शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शिरूर तालुक्यातील हिवरसिंगा येथील शेतकरी कुटे लक्ष्मण बारीकराव (वय ५५) यांची एक एक्कर मधील लावलेली सरकी शुक्रवार (दि.२८) रोजी रात्री अज्ञाताने उपटली. शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता झालेली घटना त्यांच्या निदर्शनात आली.घडलेली हकीगत शेजारच्या शेकऱ्यांना सांगितली असता कोणालाच काही माहिती नव्हती.मागील काही दिवसांपूर्वी शेतातील कडबा,पाण्याच्या नळ्या,विद्युत मोटारीचे वायर यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान अज्ञाताने केले होते. लक्ष्मण कुटे या शेकऱ्याचे जवळपास ४ हजारांचे नुकसान यामध्ये झाले असून अज्ञात आरोपी विरोधात शिरूर कासार पोलीस ठाण्यात रविवार (दि.२९)रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Back to top button