बीड

पोलीस हक्क संघर्ष संघटनेचा दुसरा वर्धापन दिवस उत्साहात साजरा

पोलीस हक्क संघर्ष संघटनेचा दुसरा वर्धापन दिवस उत्साहात साजरा

बीड(प्रतिनिधी)-शाह अल्पसंख्याक बहुउद्देशीय सेवासंस्था संचलित पोलीस हक्क संघर्ष संघटनेचा दुसरा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान पुस्तक वाटप करुन आणि होतकरु महिलांना साडीचे वाटप करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये बोलतांना मान्यवरांनी म्हटले की, पोलीस हक्क संघर्ष संघटनेकडून आतापर्यंत पोलीस भरतीचे पुर्व प्रशिक्षण, स्त्रीयांवरील अन्यायाविरोधात लढा दिला गेला तसेच समुपदेशन करुन समाजातील प्रश्न मिटवण्याचे काम संघटनेने केलेले आहे परंतू आता संघटना विस्तारत असून जबाबदारी वाढत आहे त्यामुळे महिला भगिनींसाठी उपयोगी शिबिर संघटनेने राबवावीत आणि संघटनेने राज्यपातळीवर सर्व ठिकाणी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाला यावेळी अध्यक्ष अब्दुल कदीर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संस्थापक अध्यक्ष झेबा शेख मॅडम, कार्यक्रमाचे उद्घाटक वाहतूक शाखेचे पीएसआय  विजय जाधवर,  विशेष उपस्थिती राजेंद्र लहानेसर, मुस्तफा खान, बाळासाहेब राखे , नाझिमोद्दीन काझी, वसंत सगळे, सुदाम लाड, बाबुराव बडे, राजश्री देबजे तसेच संभाजीनगर जिल्हा, परभणी जिल्हा, पुणे जिल्हा, बीड जिल्हा, बुलढाणा जिल्हा इथून आलेले सर्व मान्यवर पदाधिकारी महिला व पुरुष मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

Back to top button