बीड

चकलांबा पोलिसांनी पकडला वाळू वाहतूक करणारा हायवा एक आरोपी ताब्यात;२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

चकलांबा पोलिसांनी पकडला वाळू वाहतूक करणारा हायवा
एक आरोपी ताब्यात;२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
मादळमोही दि, २५  (प्रतिनिधी):-पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवायाच्या दिलेल्या सुचनेनुसार चकलांबा पोलिसांच्या वतीने कारवाईची मोहीम राबविण्यात येतं आहे.उमापूर-माटेगाव रस्त्यावर वाळू वाहतूक करणारा एक हायवा सपोनि संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर वाहने आडवी लावून ताब्यात घेण्यात आला. यावेळी एका आरोपीला पकडण्यात आले असून या कारवाईत २५ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
   मंगळवारी रात्री गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की एक हायवा वाळू भरून उमापूर ते माटेगाव असा जात आहे , तरी आम्ही स्वतः स्टाफ सह लागलीच मालेगाव येथे सापळा रचून बसलो होतोत. यावेळी भरधाव वेगात हायवा येतं असल्याचे दिसतात रस्त्याच्या मध्यभागी एक दुचाकी हायवला आडवी लावण्यात आली व हायवा पोलिसांनी ताब्यात घेतला. यावेळी गाडी मध्ये वाळूची चोरट्या मार्गाने तस्करी करण्यात येतं असल्याचे समोर आले. त्यानुसारसारफराज राजू पठाणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक श्री. राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, पोह अमोल येळे, विनोद सुरवसे,प्रशांत घोंगडे यांनी केली.
Back to top button