📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

दहशतवादाविरुद्ध लढणे प्रत्येकाचे कर्तव्य – प्राचार्य हांगे

दहशतवादाविरुद्ध लढणे प्रत्येकाचे कर्तव्य – प्राचार्य हांगे

प्रतिनिधी / पाटोदा -देशातच नव्हे तर संपूर्ण जगात दहशतवाद व हिंसाचार बोकाळत चालला असून त्यामुळे माणुसकी, सहिष्णुता, सामंजस्य व एकोपा धोक्यात येत आहे. भारताच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सकल मानव समाजात शांतता व ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी दहशतवादी व हिंसाचारी शक्तींविरुद्द लढणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे यांनी केले. येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २१ मे रोजी स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी  दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आयोजित प्रतिज्ञागृहण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. अभय क्षीरसागर, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. मनोजकुमार प्रकाश,  कार्यालय अधीक्षक अशोक पवार उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य हांगे पुढे म्हणाले की, आपल्या डोळ्यांसमोर दुर्घटना अथवा हिंसाचार घडत असताना बघ्यांची भूमिका न घेता प्रत्येकाने तो हिंसाचार थांबवला पाहिजे. सामाजिक सलोखा हा समाजोन्नतीसाठी आवश्यक असून तो टिकवून ठेवणे  प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अभिवादन व प्रतिज्ञागृहण कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, पालक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button