📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

दहावीच्या गुणवंत कु.पायल वायफळकर चा आम आदमी पार्टी, रासपा व वाहतूक संघटनाकडून सत्कार

दहावीच्या गुणवंत कु.पायल वायफळकर चा आम आदमी पार्टी, रासपा व वाहतूक संघटनाकडून सत्कार

आरोळे वस्ति येथील पायलचा यशस्वी संघर्ष ; समाजात प्रेरणादायी ठसा

पायल वायफळकरचा दहावी परीक्षेत ९४.८०% गुणांसह मोठे यश

जामखेड प्रतिनिधी – दि. १७:आरोळे वस्ती येथील कु. पायल मच्छिंद्र वायफळकर हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ४७४ गुण (९४.८०%) मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. प्रतिकूल परिस्थिती असूनही आपल्या जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल.ना. होशिंग विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या पायल हिचा आम आदमी पार्टी, रासप, वाहतूक संघटना यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तिला फेटा, पुष्पगुच्छ व पेढे भरवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा, रासपाचे विकास मासाळ, भाजपाचे सुपर वॉरिअर शक्ती प्रमुख मोहन (मामा) गडदे, जिल्हा संघटक बजरंग सरडे, सरपंच तानाजी फुंदे, आनंद खरात, बापूसाहेब पवार, बाळासाहेब डूचे, सोमनाथ रोडे, गोकुळ परदेशी, संजय गळगटे, आदेश बेलेकर, सचिन नवलाखा तसेच पायलचे पालक मच्छिंद्र वायफळकर व कु. गौरी वायफळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पायलच्या या यशाबद्दल संतोष नवलाखा म्हणाले, “पायल हिने जिद्दीने अभ्यास करत आपले कुटुंब व तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!”
कार्यक्रमाच्या समारोपात उपस्थित सर्व मान्यवरांनी पायलला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*चौकट*

“पायलचे वडील मच्छिंद्र वायफळकर हे खाजगी वाहतूक चालक आहेत, आई खाद्यपदार्थांचे पॅकिंग करण्याचे काम करते, तर आजी – आजोबा वडापावचे दुकान चालवतात. वायफळकर कुटुंबात कोणाचेही मोठे शिक्षण नाही आणि आर्थिक परिस्थितीही बरी नाही. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही पायलने हार न मानता शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपले शिक्षण सुरू ठेवले आहे. तिची जिद्द आणि चिकाटी हेच तिच्या यशाचे खरे शिखर ठरले आहे.”

Back to top button