बीड

जामखेड येथे भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारिणी घोषित

जामखेड येथे भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारिणी घोषित

तालुकाध्यक्षपदी बौध्दाचार्य आशोक आव्हाड तर सरचिटणीस मुकुंद घायतडक

जामखेड प्रतिनिधी– भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका कार्यकारिणीची नवी घोषणा दि.४ मे रोजी जामखेड येथे करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, जिल्हा उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन) पंडित मोरे, जिल्हा संघटक माधवराव चाबुकस्वार, कायदेशीर सल्लागार राहुल कांबळे, जिल्हा संस्कार सचिव बलभिम जावळे, हिशोब तपासनीस संतोष कांबळे, संघटक बाळासाहेब धस, शेवगाव शहराध्यक्ष संतोष ठोंबरे, कोषाध्यक्ष बाळासाहेब लहासे, संरक्षण सचिव गोरख केदारे, सरचिटणीस सुनील साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात खालील पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर झाली:

तालुकाध्यक्ष – आशोक आव्हाड,सरचिटणीस – मुकुंद घायतडक,कोषाध्यक्ष – संजय वारभोग,उपाध्यक्ष (संस्कार) – राजेंद्र धनवे,संस्कार सचिव – राजेंद्र गव्हाळे, भिमराज शिंदे, संतोष मोरे,
हिशोब तपासनीस – सुनील गव्हाळे,
उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन) – प्रशांत पोळ, आदेश भोसले, उपाध्यक्ष (संरक्षण) – खुशाल आव्हाड, संघटक – परशुराम बनसोडे,संरक्षण सचिव – जयभिम घायतडक,कायदेशीर सल्लागार – ॲड. बाळासाहेब घोडेस्वार, सचिव (प्रचार व पर्यटन) – अनिल सदाफुले निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे,कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित मोरे,बाळासाहेब धस,आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी नवनियुक्त तालुकाध्यक्ष आशोक आव्हाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*बौद्धाचार्य अशोक आव्हाड यांचे सामाजिक योगदान*

बौद्धाचार्य अशोक आव्हाड हे सामाजिक न्याय, बौद्ध संस्कृतीचा प्रसार, आणि ग्रामीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. ते जामखेड तालुक्यातील विविध भागांमध्ये भिक्खू संघ, उपासक-उपासिका वर्ग, तसेच तरुणांसाठी बौद्ध धम्मशिबीरांचे आयोजन करतात.

*महत्त्वाची कार्ये:*

धम्मप्रसार: गावोगावी जाऊन धम्मदेशना, धम्मग्रंथांचे वाटप, बौद्ध तत्त्वज्ञानाचे प्रशिक्षण.

शैक्षणिक मदत: गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फी मदत, मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे.

समतामूलक चळवळ: आंबेडकरी विचारधारेचा प्रचार, संविधान जागर अभियानात सक्रिय सहभाग.

सामाजिक सलोखा: विविध जाती-धर्मांमध्ये संवाद साधून सामाजिक ऐक्य वाढवणे.

नशाबंदी प्रचार: युवकांमध्ये व्यसनमुक्तीसाठी जनजागृती मोहीम राबवणे.

त्यांचे नेतृत्व स्थानिक पातळीवर बळकट असून, अनेक तरुण त्यांच्या कार्यप्रेरणेतून सामाजिक क्षेत्रात उतरले आहेत. नुकत्याच झालेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या बैठकीत त्यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड ही त्यांच्या नेतृत्वाला मिळालेली सामाजिक मान्यता आहे.

Back to top button