📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

शिऊर येथील महात्मा फुले नगर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

शिऊर येथील महात्मा फुले नगर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांचे बहारदार सांस्कृतिक सादरीकरण; “आपलीच हवा” डान्सची विशेष दाद

जामखेड प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील शिऊर येथील महात्मा फुले नगर वसाहतीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शुकवार रोजी उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरणातून आपले कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी, नृत्य, नाट्यछटा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. “आपलीच हवा” या गाण्यावर सादर केलेल्या डान्सने विशेषतः रसिकांची दाद मिळवली. टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी रंगतदार सादरीकरण करत वातावरणात रंग भरला.
यावेळी प्रस्ताविक करताना मुख्याध्यापक जालिंदर यादव यांनी सांगितले की,शाळा ही केवळ ज्ञानदानाचे केंद्र नसून, मूल्यांची संस्कारशाळा आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा अखंड प्रयत्नशील आहे.
या कार्यक्रमासाठी माजी सभापती गौतम उतेकर, बाजार समितीचे संचालक विठ्ठल चव्हाण,माजी उपसरपंच विठ्ठल (वस्ताद) देवकाते,शाळा व्या.समिती अध्यक्ष सोमनाथ कडू, केंद्रप्रमुख राम निकम, विश्वस्त मंडळाचे मुकुंदराज सातपुते, लेखक एकनाथ चव्हाण, दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार,सोसायटी व्हा.चेअरमन उत्तम तनपुरे,संचालक आप्पा निकम,ग्रा.पंचायत सदस्य नारायण निकम, नरेंद्र पाचारे ,उषाताई निकम आदी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‌या कार्यक्रमासाठी शिक्षक बांधव ज्योती यादव,सुनील भामुद्रे, सुशिल पौळ, राजेंद्र साठे,विजय चव्हाण, संतोष लगड,भागवत निंबाळकर, सतिश यादव उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, गुरुमाऊली, सदिच्छा मंडळ जामखेड यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महात्मा फुले नगर शिऊर शाळेस पंच भाऊ’पुस्तक ५ प्रती भेट दिली
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक जालिंदर यादव, उपाध्यापक बाळासाहेब तनपुरे, रविंद्र तांबे, प्रशांत कुंभार , भगवान समुद्र , बळीराम कदम,सर्व व्यावस्थापन समिती व पालक आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहरदार शैलीत मुकुंदराज सातपुते आणि पंचभाऊ पुस्तकाचे लेखक एकनाथ चव्हाण यांनी केले तर आभारप्रदर्शन सहशिक्षक बाळासाहेब तनपूरे यांनी केले.

Back to top button