बीड

नवीन जिल्हाधिकाऱ्यांकडून बीडकरांचा पूर्ण अपेक्षा भंग…. प्रा. डी.जी. तांदळे.

नवीन जिल्हाधिकाऱ्यांकडून बीडकरांचा पूर्ण अपेक्षा भंग…. प्रा. डी.जी. तांदळे.
बीड प्रतिनिधी -:- बीड शहर बचाव मंचाचे प्रमुख मार्गदर्शक कॉ. प्राचार्य डी.जी. तांदळे सर, नितीनजी जायभाये, कॉम्रेड सुधीर देशमुख, डॉक्टर संजय तांदळे, रूपालीताई देशपांडे, ॲड. अनिल  बारगजे, ॲड.नितीन वाघमारे, हाफिज मोईनुद्दीन शेख शहर काझी, बीएसपी चे जि. अध्यक्ष  प्रशांत वासनिक, संपादक-पत्रकार नितेश उपाध्ये, बाजीराव ढाकणे आधी सहकार्यांनी नवीन जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली. बीड शहरातील अतिशय उग्र स्वरूप धारण करू लागलेली भीषण  पाणीटंचाई व इतर अनेक गंभीर प्रश्न-गंभीर समस्या,व शहरातील नागरिकांचे त्या अनुषंगाने चाललेले हाल त्यांच्यासमोर पोट तिडकीने मांडले.
नवीन जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बीड जिल्ह्याचा कारभार जनताभिमुख करणार असां काहीसा भास निर्माण करण्यात आला होता. त्या अनुषंगाने त्यांनी जनता दरबाराचे आयोजन केलेले आहे. काल दुसऱ्याच दिवशी जनता दरबार केवळ फार्स वाटावा इतपत बीडकरांचा अपेक्षाभंग झाला आहे असे असे कॉ. प्रा. डी.जी. तांदळे यांनी सांगितले आहे. जनता दरबाराच्या नाट्य बद्दल अधिक माहिती देताना तांदळे सर यांनी सांगितले की, जनतेचे घराणे मांडताना प्रामुख्याने बीड नगर परिषदेचा गलथान, भ्रष्ट, मनमानी, बेपर्वा कारभार विशेषतः पाणीपुरवठा, भीषण पाणीटंचाई, स्वच्छता, धानोरा रोड, नगर रोड वरील यु’टर्न यासंबंधी मांडणी करताना कलेक्टर महोदय केवळ काही तांत्रिक व थातूरमातूर प्रतिसाद देत असताना जनतेचा अपेक्षा भंग करीत असल्याचे पुन्हा पुन्हा दिसुन येत होते.
नगरपरिषद अस्तित्वात नसल्याने मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी ठराविक कंत्राटदार, प्रभावी राजकारणी यांचे पावले आहे. हे सगळे बेताल झालेले आहेत. जनतेच्या समस्या भीषण होत चाललेल्या आहेत. मुख्याधिकारी नीता अंधारे व काही कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, नसता बदली करावी अशी आग्रहपूर्वक मागणी बीड शहर बचाव मंचाने केलेली आहे. परवा विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंगमध्ये देखील जनतेच्या आवश्यक  रास्त तातडीच्या मागण्या बीड शहर बचाव मंचाने मांडल्या आहेत.
जनता दरबारासाठी नागरिकांना जिल्हाधिकारी साहेबांची तीन तास प्रतीक्षा करावी लागली. जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून निवेदने वगैरे स्वीकारणार अशी माहिती प्रस्तुत झाल्याने विविध संघटना, पक्ष, युवा कार्यकर्ते, व्यापारी, जेष्ठ नागरिक, पत्रकार, डॉक्टर, विधीज्ञ, प्राचार्य, काझी, सामाजिक कार्यकर्ते, महिला असे दोनशेच्या वर लोक प्रतिनिधिक स्वरूपात मोठ्या संख्येने जमा झाले होते. भर उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेमध्ये हॉलमध्ये लोकांची गैरसोय झाली होती. कसल्याही प्रकारची  पिण्याच्या पाण्याची व पंख्याची व्यवस्था केलेली नव्हती. पुरेशा खुर्च्या व बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेक लोक ताटकळत उभे राहूनच जनता दरबार करत होते. जिल्हाधिकारी साहेबांच्या या वागण्यावर बीड शहर बचाव मंचाने तीव्र असंतोष व्यक्त केला. त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब यांनी तीन तासानंतर जनता दरबाराकडे  धाव घेतली. जनता दरबार कशासाठी व कसा असतो हेच त्यांना स्वतःला अजून ही माहित नाही हेच निदर्शनास आले. जनता दरबारासाठी आलेले विविध क्षेत्रातील शंभराहून अधिक लोक संताप व्यक्त करत निघून गेले. . जिल्हाधिकारी साहेबांनी घोषित केलेल्या फसव्या जनता दरबाराचा त्यांच्याच अवस्थेमुळे फज्जा उडालेला दिसून आला.
Back to top button