सभापती प्रा.राम शिंदेंचा सहकाराचा नवा अध्याय

चौंडीत सहकार क्रांती ,संचालकांचा भाजपात प्रवेश ; चेअरमन पदी वत्सलाबाई भांडवलकर
जामखेड प्रतिनिधी :
चौंडी सोसायटीच्या संचालकांनी एकमताने भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत नवीन नेतृत्वाची घोषणा केली. यावेळी सौ. वत्सलाबाई सुभाष भांडवलकर यांची चेअरमन म्हणून आणि श्री .बाबू विठोबा शिंदे यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की,चौंडी व आधी या दोन गावांच्या संयुक्त विविध कार्यकारी सेवा संस्थेतील तत्कालीन चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि एका संचालकावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे शासनाने कारवाई करत तिघांचे संचालकपद रद्द केले होते. त्यानंतर संस्थेतील चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदे रिक्तच होती.
संस्थेतील नऊ संचालकांनी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकजूट दाखवत चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी अंतिम निर्णय प्रा. शिंदे यांचाच असे एकमताने ठरवले होते.
आज, ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत प्रा. राम शिंदे यांनी प्रक्रिया सुरू होण्याच्या अवघ्या दहा मिनिटे आधी चेअरमनपदासाठी वच्छला सुभाष भांडवलकर तर व्हाईस चेअरमनपदासाठी बाबुराव शिंदे या नावांची घोषणा केली. प्रा. शिंदे यांच्या या निर्णायक भूमिकेनंतर दोन्ही संचालकांची निवड बिनविरोधपणे पार पडली आणि संस्थेला अखेर नव्या नेतृत्वाचा चेहरा मिळाला.
संचालक मंडळ खालीलप्रमाणे
पुष्पावती देवकर, अशोक देवकर, भाऊसाहेब उदमले,संदीप शेळके,अनिल शिंदे, अशोक भगत, महंमद शेख
या निवडीबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सभापती प्रा.राम शिंदे यांच्या कार्यालयात भाजपाचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे, शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या हस्ते मानाचा फेटा बांधून तसेच पेढा भरवत सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये आनंद उत्सव साजरा केला.यावेळी बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले,माजी डॉ.भगवान मुरूमकर,उपसभापती नंदकुमार गोरे,नगरसेवक अमित चिंतामणी,प्रविण चोरडीया, मनोज कुलकर्णी,पोपट राळेभात,बाजार समितीचे संचालक राहुल बेदमुथ्या,नारायण जायभाय, डॉ.गणेश जगताप,संचालक पै.काकासाहेब गर्जे,पांडुरंग उबाळे, उद्योजक विशाल शिंदे,चेअरमन जालिंदर चव्हाण, पवनराजे राळेभात, युवा नेते मोहन देवकाते,सरपंच भिमराव कापसे,लहु शिंदे,राम पवार,गणेश वारे, डॉ अल्ताब शेख, संतोष कर्डुले,पोपट जमदाडे, नवनाथ ढवळे, आबा ढवळे, भाऊ शिंदे, भारत पाटील, राहुल चोरगे, गौतम कोल्हे,अशोक शिंदे, विशाल भांडवलकर,सतिश लांबाटे, तुकाराम शिंदे, दत्ता शिंदे,आनंद शिंदे,सादिक शेख,संतोष कोरडे, उद्धव हुलगुंडे,बाळासाहेब बोराटे, अजिंक्य शिंदे, विशाल गौतम शिंदे, राजेंद्र टकले, मिलिंद देवकर, तुकाराम उदमले, अक्षय उबाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.
चौकट
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती महोदयांनी जिल्हा बँकेत लक्ष द्यावं लागेल असा सूचक इशारा दिला होता. त्यानंतर आज त्या बदलाची पहिली झलक चौंडी गावात पाहायला मिळाली आहे. विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चौंडी सहकार सेवा सोसायटी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली आहे.जिल्हा बँक संचालकांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या चौंडी सहकार सेवा सोसायटीच्या या नव्या बदलामुळे स्थानिक सहकार क्षेत्रात नवा राजकीय समीकरणांचा अध्याय सुरू झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.



