शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा पाया घडवला — नासीर सय्यद

शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा पाया घडवला — नासीर सय्यद
जि.प. प्राथ.शाळा मराठी मुले येथील चौथी च्या विद्यार्थ्यांना निरोप व गुणवंतांचा सत्कार
जामखेड प्रतिनिधी :गेल्या चार वर्षांत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकून विद्यार्थ्यांनी घडण्याचा आणि वाढण्याचा प्रवास केला आहे. या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्याचे कार्य केले असून, भविष्यात या पायावर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण सहज पूर्ण करता येईल, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष नासीर सय्यद यांनी केले.
आज दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , मराठी मुले येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांद्वारे शाळेविषयी प्रेम आणि शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना शाळा सोडताना वाटणाऱ्या भावनांना वाट मोकळी करून दिली.कार्यक्रमाची सुरवात ज्योतीक्रांती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष नासीर सय्यद हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार उपस्थित होते.
पुढे बोलताना सय्यद म्हणाले, बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी शाळेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्यार्थी पुढील शिक्षणात यश मिळवून आपले पालक, शिक्षक आणि शाळेचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करतो.
यावेळी प्रा.डाॅ.शिवाजी राळेभात, दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार, तौफिक शेख आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक संजय कर्डिले (मुले), मुख्याध्यापक दत्तात्रय यादव (मुली), शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष उपाध्यक्ष संतोष तवटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष (मुली) प्रा.डाॅ.शिवाजीराव राळेभात, उपाध्यक्ष निलेश गायकवाड, सदस्य तोफीक शेख, नागेश टेकाळे, संदीप धाऊड आदी शिक्षक, शिक्षिका, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीमती अल्का धाऊड, श्रीमती राधा डिसले, श्रीमती वंदना मोरे, श्रीमती कल्पना ससाणे, श्रीमती कल्पना साबळे, श्रीमती राणी वराडे, श्रीमती रेखा साळे, श्रीमती कल्पना मोरे ,श्रीमती कालिंदा म्हेत्रे,श्रीमती सारिका पोले, श्रीमती सरिता कवडे,नितीन मोहळकर,अंबादास जोगदंड आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सागर माकुडे व आभार प्रदर्शन शिरिष कदम यांनी मानले.कार्यक्रमाच्या सांगतेस शाळेतील विद्यार्थ्यांना लापशी व सांबर भात चे जेवण देण्यात आले.



