बीड

भिमजयंती निमित्त सदाफुले कुटुंबियांकडून खीरदानाचा उपक्रम सामाजिक सलोखा वाढवणारे आयोजन

भिमजयंती निमित्त सदाफुले कुटुंबियांकडून खीरदानाचा उपक्रम

सामाजिक सलोखा वाढवणारे आयोजन

जामखेड / प्रतिनिधी:-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जामखेड शहरातील सदाफुले वस्ती येथे सामाजिक बांधिलकी जपत खीरदान व गोड जेवणाचा कार्यक्रम पार पडला. हा उपक्रम आंबेडकरी चळवळीतील युवक नेता व सामाजिक कार्यकर्ता विकी सदाफुले आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक अँड. अरुण जाधव, बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. प्रमोद राऊत, डॉ. सुशील पन्हाळकर, बापूसाहेब गायकवाड, राजेंद्र सदाफुले, राजन समिंदर , लेखक संतोष पवार, अरविंद जाधव, शहानुर काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विकी सदाफुले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भिमजयंती ही सणासारखी साजरी होऊन प्रत्येकाच्या मनामनात रुजली पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांना अनुसरून सामाजिक ऐक्य व समतेचा संदेश देण्याचे कार्य सातत्याने केले पाहिजे.”

कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे निळ्या टोप्या व गुलाबपुष्प देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंडलाधिकारी मुरलीधर सदाफुले, माजी उपसभापती सुशीलकुमार सदाफुले, विकी सदाफुले, सनी सदाफुले, आनंदराज सदाफुले, मयुर सदाफुले तसेच मित्रपरिवाराचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले.

संपूर्ण कार्यक्रमात सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि आंबेडकरी विचारांची जागृती घडवण्यात आली.

Back to top button