बीड
कर्जदार सावंत यांच्या मालमत्तेचा ताबा देण्याचे डी. आर. टी. कोर्टाचे आदेश

कर्जदार सावंत यांच्या मालमत्तेचा ताबा देण्याचे डी. आर. टी. कोर्टाचे आदेश
बँकेने दोन दिवसात मालमत्तेचा ताबा द्यावा – सावंत
बीड (प्रतिनिधी):- शहरातील विठ्ठल नगर येथील सुजाता सावंत व त्यांचे पती लक्ष्मण सावंत, यांनी काही वर्षापूर्वी डीसीबी बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जाचा हप्ता वेळेवर न भरल्यामुळे त्यांची स्थावर मालमत्ता बँकेने सील केली होती त्यानंतर त्यांनी बँकेत थकीत कर्ज भरण्यासाठी गेले असता त्यांची मालमत्ता विक्री झाल्याची कळाले असता बँकेने केलेल्या प्रक्रिये विरुद्ध डीआरटी कोर्टात अपील सादर केले होते. त्यानंतर डीआरटी कोर्टाने 5 एप्रिल 2025 रोजी बँकेला आदेशित करत डीसीबी बँकेने केलेल्या प्रक्रिया रद्द करून सुजाता सावंत, लक्ष्मण सावंत यांची सील केलेली स्थावर मालमत्ता आदेश दिल्यापासून पाच दिवसाच्या आत परत देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु बँकेने अद्याप ताबा दिलेला नाही त्यामुळे सावंत यांनी दोन दिवसात बँकेने मालमत्तेचा ताबा द्यावा अन्यथा स्वतः मालमत्तेचा ताबा घेणार असल्याचं त्यांनी याबाबत कळविले आहे.



