बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांना अमृतमहोत्सवात सन्मान

बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांना अमृतमहोत्सवात सन्मान
संगमनेर येथे जामखेडच्या 10 कार्यकर्त्यांना सामाजिक सन्मान पुरस्कार
जामखेड प्रतिनिधी -भारतीय संविधान अमृतमहोत्सव, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि दादासाहेब रूपवते जन्मशताब्दी निमित्त, कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन बहुजन शिक्षण संघ, मार्केट पब्लिकेशन आणि सुजात फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमात जामखेड येथील आयु. दीपक साहेबराव तुपेरे, आयु. बापूसाहेब अभिमान ओहोळ, आयु. हरिभाऊ गोविंदराव कदम, आयु. प्रकाश महादेव सदाफुले, आयु. नामदेव गेणाजी राळेभात, आयु. विठ्ठल काशिनाथ ससाणे, आयु. गोकुळ श्रीरंग गायकवाड, आयु. निशाताई रविंद्र निकाळजे आणि आयु. मंदा महेंद्र घायतडक यांना सामाजिक कार्यकर्ता सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲड. संघराज रूपवते यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रल्हाद लोलेकर होते, तर उद्घाटन ज्येष्ठ कवी आणि माजी आमदार लहू कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते हे मान्यवर उपस्थित होते.



