📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जामखेड पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक; आंबेडकर जयंती शिस्तबद्ध साजरी करण्याचे आवाहन

जामखेड पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक; आंबेडकर जयंती शिस्तबद्ध साजरी करण्याचे आवाहन

शिस्तबद्ध आणि शांततेत आंबेडकर जयंती साजरी करण्याचा – पोलीस निरीक्षकांचा संदेश

जामखेड | प्रतिनिधी:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत व शिस्तबद्धरीत्या पार पाडण्यासाठी जामखेड पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक झाली. शहरातील विविध सामाजिक संघटना, भिमसैनिक, पोलीस प्रशासन व नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी मिरवणुकीत केवळ डॉ. आंबेडकर यांचेच फोटो लावावेत, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट्स टाळाव्यात, असे स्पष्ट केले. प्रा. मधुकर राळेभात यांनी प्रतिमा पूजन सकाळी १० पूर्वीच करण्याचा सल्ला दिला. ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी महापुरुषांच्या विचारांना गालबोट लागू नये यासाठी समाजाने एकत्र यावे, असे सांगितले.
प्राचार्य विकी घायतडक यांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. संध्या सोनवणे यांनी सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन आदर्श जयंती साजरी करावी, असे म्हटले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी डिजेचा आवाज नियंत्रित ठेवावा, लेझर लाईट्स टाळाव्यात व महिलांच्या सुरक्षेची दक्षता घ्यावी, असे सांगितले.
या बैठकीस भाजपा जेष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड डॉ अरुण जाधव, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, नगरसेवक मोहन पवार,दिगांबर चव्हाण,प्राचार्य विकी घायतडक, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष काका राळेभात,भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात,आनंद सदाफुले,राणा सदाफुले,दिपक सदाफुले,विकी गायकवाड, मच्छिंद्र जाधव,मनिष घायतडक,आकिब आतार,आतिष मेघडंबर, राम गायकवाड आदी भिमसैनिक तसेच नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे तुषार केवडे,लिपिक लक्ष्मण माने उपस्थित होते.
या बैठकीचे नियोजन पोलीस नाईक अविनाश ढेरे यांनी केले.

*पोलीस प्रशासनाच्या सूचना*

1. महिलांशी छेडछाड होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.
2. ध्वनी प्रदूषण टाळावे. डिजे आवाजाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
3. लेझर सिस्टीम व लाइट्स वापरू नयेत – ते डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतात.
4. प्रतिमा पूजन ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी.
5. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी.
6. सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान किंवा वादग्रस्त फॉरवर्ड करू नयेत.
7. जुन्या घटनांचा संदर्भ देत आक्षेपार्ह पोस्टर्स टाकू नयेत.
8. मिरवणुकीचे मार्ग निश्चित पाळावेत.
9. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार, जसे की कपडे काढणे, टाळावे.

सर्वांनी सहकार्य करून शांतता आणि शिस्तीने उत्सव साजरा करावा.

Back to top button