महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे फुले दांपत्य आजही प्रेरणास्थान – प्राचार्य घायतडक

महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे फुले दांपत्य आजही प्रेरणास्थान – प्राचार्य घायतडक
महात्मा फुले जयंतीनिमित्त डिप्लोमा कॉलेजमध्ये अभिवादन कार्यक्रम संपन्न
जामखेड प्रतिनिधी -माहिलांना चूल आणि मूल एवढेच अधिकार असताना ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.महिलांना हक्क व संरक्षण संविधानाच्या माध्यमातून मिळाले.महापुरुषांचे विचार अंगिकारले पाहिजे.असे प्रतिपादन प्राचार्य विकी घायतडक यांनी केले.
आज दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी शहरातील डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी काॅलेज येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा.किशोर हुंबे,प्रा.जयसिंग पवार,प्रा. राहिल शेख,प्रा.स्नेहल भोगे,प्रा.शुभदा भोज ,प्रा.पूनम कांबळे,प्रा.आश्विनी पोटफोडे,प्रा.दुलारी परदेशी,प्रा.माधुरी म्हेत्रे, सिनिअर क्लर्क सविता सुतार, अधिक्षक संतोष डहाळे, लिपिक संतोष जगताप,प्रतिक उदारे,सौरभ पवार, विवेक ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.



