बीड
शिवछत्र परिवाराने आणले गोदावरी नदी पात्रात पाणी शेतकरी व नागरिकांनी अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांचे मानले आभार

शिवछत्र परिवाराने आणले गोदावरी नदी पात्रात पाणी
शेतकरी व नागरिकांनी अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांचे मानले आभार
गेवराई दि.९ (प्रतिनिधी):- गोदापट्टयातील शेतकरी व नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांनी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे गोदावरी नदी पात्रात नाथसागरातून पाणी सोडण्यात आले आहे. उन्हाळ्यात गोदावरी पात्र पाण्याने भरले असून जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नाटकर, मदन भुसारे यांच्यासह गोदापट्यातील सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते,
शेतकरी व नागरिकांनी माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोदाकाठच्या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. गोदावरी नदी कोरडी पडली होती. जनावरांसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांच्या कडे गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी आपला प्रश्न मांडला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर दखल घेऊन अमरसिंह पंडित यांनी शासन दरबारी प्रयत्न करुन हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला आहे. जायकवाडी धरणाच्या पैठण उजव्या कालव्यातून गुळज येथील सी.आर. ३ व तळणेवाडी येथील सी.आर. ४ मधुन गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गेवराई व अंबड तालुक्यातील गोदाकाठच्या दोन्ही बाजुच्या शेतकरी व नागरीकांना या पाण्याचा फायदा झाला असून
सर्व शेतकरी व नागरीकांनी आनंद व्यक्त केला आहे. गोदापटट्यातील नागझरी ख खामगाव, सावळेश्वर, राक्षसभुवन सुरळेगाव व ईतर सर्व शेतकऱ्यांच्या वतीने अमरसिंह पंडित साहेब व आ. विजयसिंह पंडित यांनी गोदावरी नदी पात्रात पाणी आणल्या बद्दल शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला.
तर ८ क्युबिक क्युसेक मिटर पाणी मिळाले असते—भाऊसाहेब नाटकर
================
या बाबत माहिती देताना जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नाटकर म्हणाले की, लोकनेते अमरसिंह पंडित व आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून गोदापटट्यातील सर्व नागरिकाच्या वतीने फक्त गेवराई तालुक्यांच्या मागणीनुसार तेवढेच पाणी सुटले, जसे गेवराई तालुक्यातील नागरिकांनी प्रस्ताव दिले तसेच अंबड तालुक्यातील नागरीकांनी प्रस्ताव दिल प्रस्ताव दिले होते परंतु त्यांनी विहित नमुन्यात प्रस्ताव न दिल्याने जास्तीचे पाणी त्यांना मिळाले नाही. गेवराई तालुक्यातील मागणीनुसार तेवढेच पाणी सुटले. अंबड तालुक्यातील नागरिकाच्या मागनी प्रमाणे पाणी आले असते तर पाथरवाला परिसराला फायदा झाला असता. वाळकेश्वर संगमजळगाव अगरनांदर व हिंगणगाव या भागातील शेतकऱ्यांनी जसा प्रस्ताव पाहिजे होता तसा त्यानी दिला नाही या कारणानी अंबड तालुक्यातील नागरीकाची मागणी तसीच राहीली. पाहिजे त्या नमुन्यामधे प्रस्ताव दाखल केल्यामुळे ३ क्युबिक क्युसेक मिटर पाणी सुटले. अंबड तालुक्यातील नागरीकांचा प्रस्ताव आला असता तर ८ क्युसिक मिटर पाणी सुटले आसते आणि शहागडच्या बंधारावरुध पाथरवाला बंधारा पर्यंत पाणी आले आसते अशी प्रतिक्रिया जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नाटकर यांनी यावेळी दिली. गोदावरी नदी पात्रातील शहागड को.प.बंधाऱ्यांचे बॅरेज मध्ये रुपांतर करण्याची मागणी आपण आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या कडे केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



