बीड

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त ; भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त ; भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

सेवा हाच धर्म! – वर्धमान गणेश प्रतिष्ठाण व शिंगवी सेवाभावी प्रतिष्ठाणचा अनोखा उपक्रम!

जामखेड -: भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त वर्धमान गणेश प्रतिष्ठाण आणि स्व. सुंदरबाई कन्हैय्यालाल शिंगवी सेवाभावी प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर साध्वी प्रतिभा आयुर्वेदिक हॉस्पिटल (आरोग्यधाम) आणि प. पू. श्री आनंदऋषीजी नेत्रालय, अहिल्यानगर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.

शिबिर शनिवार, दि. ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत वर्धमान गणेश प्रतिष्ठाण, साध्वी प्रतिभा आयुर्वेदिक हॉस्पिटल, आरोग्यधाम, गोकुळवाडी, ता. बदनापूर, जि. जालना येथे होणार आहे. या शिबिरात डोळ्यांच्या विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार असून, गरजूंना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून अल्पदरात लेन्स प्रत्यारोपणाची सुविधा दिली जाणार आहे.

*शिबिरातील विशेष सुविधा:*

1. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्स प्रत्यारोपण – केवळ रु. २२००/- मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नेत्रतज्ज्ञांकडून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून लेन्स बसविण्यात येईल.
2. तज्ज्ञ डॉक्टरांकडून संगणकाद्वारे नेत्र तपासणी – अत्याधुनिक उपकरणांद्वारे तपासणी केली जाईल.
3. मोफत औषधोपचार व काळा चष्मा – ऑपरेशन झालेल्या रुग्णांना मोफत औषधे आणि काळा चष्मा दिला जाईल.
4. रुग्णांसाठी मोफत निवास व भोजनाची व्यवस्था – शस्त्रक्रियेनंतर आवश्यक राहण्याची आणि जेवणाची मोफत सुविधा उपलब्ध असेल.
5. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे – आधारकार्ड किंवा रेशनकार्ड यापैकी एक कागदपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
6. चालू औषधे व गोळ्या सोबत आणाव्यात – जेणेकरून तपासणीदरम्यान डॉक्टर त्यांचा योग्य प्रकारे विचार करू शकतील.

*नावनोंदणी सुरू – प्रवेश फी केवळ ३० रुपये!*

शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी फक्त ३० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली असून, नावनोंदणी सुरू आहे. गरजू रुग्णांनी ही सुवर्णसंधी सोडू नये व त्वरित नाव नोंदणी करावी.

*अधिक माहितीसाठी संपर्क:*
मो. 8010843437 / 9322475267

*समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम:*

वर्धमान गणेश प्रतिष्ठाण आणि स्व. सुंदरबाई कन्हैय्यालाल शिंगवी सेवाभावी प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेला हा उपक्रम समाजसेवेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी अधोरेखित होते.

Back to top button