बीड

घोटन येथिल कालीकादेवीच्या यात्रेस रविवारी प्रारंभ !

घोटन येथिल कालीकादेवीच्या यात्रेस रविवारी प्रारंभ !

अहिल्या नगर:-सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाचे कुलदैवत असणाऱ्या घोटन येथिल कालीका देवीचा यात्रा उत्सव येत्या रविवार व सोमवारी होणार असुन सर्व भाविकानी यात्रा उत्सवात सहभागी होऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन घोटन येथिल कालीका देवी संस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव गोसावी यांनी केले आहे .
रविवारी यात्रेला प्रारंभ होत असून या कालिका देवीची सकाळी महापूजा सप्तशती पाठ हवन होम पूर्णाहुती देवीचा अभिषेक आरती नंतर महाप्रसाद आहे . प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अभिषेक , तीन वाजता श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पाथर्डी शेवगांव सेवेकरांचे सप्तशती पाठ होऊन आरती नैवेद्य रात्री सात वाजता आराधना महाप्रसाद होणार आहे . रात्री कासार समाज महिला मंडळाचा सांस्कृतीक कार्यक्रम होईल तर सोमवारी दि ७ रोजी सकाळी अभिषेक दुपारी कालीका महिला भजनी मंडळ अहिल्यानगर यांचा भजनाचा कार्यक्रम व दुपारी दोन वाजता शिवशाहीर अक्षय डांगरे यांचा पोवाड्याचा व गोंधळाचा कार्यक्रम होईल दुपारी तिन वाजता कासार समाजाची व संस्थान ची जनरल मिटींग होऊन मान्यवराचे मार्गदर्शन व सत्कार होतील सायंकाळी ग्रामदैवत म्हसोबा ची पुजा व दर्शन तर सात वाजता सामुदाईक महाप्रसाद होऊन रात्री कालीका देवीची पालखी सवाद्य छबीना मिरवणूक होईल या यात्रे साठी पैठण ते घोटन . शेवगाव ते घोटन व बालमटाकळी ते घोटन येथुन भावीक पायी दिंडीने येवून यात्रेत सहभागी होणार आहेत राम नवमी व कालिकामाता प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कासार समाज बाधवानी या उत्साहात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे संस्थांनचे अध्यक्ष शिवाजीराव गोसावी उपाध्यक्ष रविशेट पाथरकर सचीव अशोकराव पाथरकर विश्वस्त विकास सातपुते अभय थिटे अनिल गोसावी कैलास गोसावी रमेश काळे प्रशांत कोळपकर सुनिल रासने कृष्णनाथ अंदुरे सदाशिव यंडे संतोष यंडे योगेश रासणे बाळकृष्ण हुलचुते बकंट व्यवहारे पाडुरंग सातपुते प्रशांत कोळपकर अनिल रासणे राजेंद्र गोसावी अप्पा रासणे गणेश गोसावी आदीनी केले आहे

Back to top button