बीड
अजित दादा बीड जिल्ह्यातील अवैध धंदे नेस्तनाबूत करा ! माजलगावात अवैध धंदे चालवणाऱ्या बोक्यांमुळे दहशतीचे सावट –

अजित दादा बीड जिल्ह्यातील अवैध धंदे नेस्तनाबूत करा !
माजलगावात अवैध धंदे चालवणाऱ्या बोक्यांमुळे दहशतीचे सावट –
माजलगांव प्रतिनिनिधी :-बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले आणि शब्दाचे पक्के मानले जाणारे अजित दादा पवार यांच्याकडून बीड जिल्ह्यातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत विकासाबरोबरच जिल्ह्यावरील दहशतीचे सावट संपुष्टात येईल अशी आशा ठेवून जगणारी जनता म्हणत आहे की बीड जिल्ह्यातील अवैध धंदे यांचे समूळ उच्चाटन करतील का अजित दादा असा प्रश्न बीड जिल्ह्यातील जनतेला पडत आहे कारण अनेक अवैध धंद्यात राजकारणाचे हात उघड होत आहेत अवैध धंद्यातून पैसा आणि पैशाच्या जोरावर दहशत निर्माण करून राजकारण करणे हा बोक्याचा छंद आहे. जिल्ह्यात वाढलेले अवैध धंदे बंद झाले तर दहशत दादागिरीचा समूळ नायनाट होईल असे जाणकार बोलत आहेत.
दादा तुम्ही परळीचा आक्का म्हणताय माजलगाव मधला मटका बोका शोधा माजलगाव तालुक्याचे विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी मसाजोग प्रकरणात हिरारीने भाग घेऊन त्यात असलेला परळीचा आका शोधून काढला मात्र माजलगाव तालुक्यातील मटक्यातील आर्थिक लोणी खाणारा बोका का नाही शोधला अशी चर्चा माजलगाव मध्ये जनता करत आहे
तर दादा म्हणजे, दुसऱ्यांचे पाहायचे वाकून आपले ठेवायचे झाकून आशा वृत्तीचे आहेत की काय अशीही चर्चा केली जात आहे.
चौकट –
मटका बुकी वरील माजलगाव पोलिसांची कारवाई कोमात शहरासह ग्रामीण भागात मटका जोमात –
माजलगावात मटक्याचा पक्का बोका कोण?
माजलगाव पोलिसांना पत्रकारांचे सर्वसामान्य जनतेने तक्रारी करून मटका बंद करण्यासाठी मागणी केली आहे मात्र पोलीस याकडेच जाणिव पूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे माजलगावात राजकारणाचा मटका किंग कोणीतरी असावा असा कयास काढत मटक्यावर बसलेला पक्का बोका कोण ?.



