बीड
माहिला शिवजन्मोत्सव समिती चे अखंड १३ वर्ष सेवा ; समाजहितासाठी कार्य कौतुकास्पद – सभापती शरद कार्ले

माहिला शिवजन्मोत्सव समिती चे अखंड १३ वर्ष सेवा ; समाजहितासाठी कार्य कौतुकास्पद – सभापती शरद कार्ले
१३४ रक्तदात्यांचे रक्तदान शिबिरात योगदान
जामखेड प्रतिनिधी – दि.१६माहिला शिवजन्मोत्सव समिती चे आजपर्यंत अखंड १३ वर्ष सेवा असून समाजहित व जनजागृती विषयी कार्य कौतुकास्पद आहे . असे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले यांनी केले.
माहिला शिवजन्मोत्सव समिती जामखेड आयोजित शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.आज दिनांक १६ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले तसेच रक्तदान शिबीराचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी सौभाग्यवती पूजा रेळेकर – बाळासाहेब रेळेकर या दांपत्याने आपले रक्त देवून रक्तदान शिबीरास सुरवात केली.
यावेळी कॅप्टन लक्ष्मण भोरे, माजी संचालक सागर सदाफुले, डॉ अशोक बांगर यांनी आपली मनोगते व्यक्त करुन माहिला शिवजन्मोत्सव समिती च्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, कॅप्टन लक्ष्मण भोरे, डॉ.अशोक बांगर,भाजपा नेते संजय काशिद,माहिला शिवजन्मोत्सव समिती च्या अध्यक्षा रोहिणीताई संजय काशिद, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रा.संजय राऊत,माजी संचालक सागर सदाफुले, शंभुसुर्य मर्दानी आखाडा अध्यक्ष बबलू टेकाळे,सावता परिषद जिल्हा संपर्कप्रमुख संतोष मोहळकर,बाळुशेठ बोथरा, दिपक काशिद,युवा नेते संतोष गव्हाळे,विजय काशिद, रंगनाथ राजगुरू,पप्पूशेठ काशिद,सुरज काळे( संस्थापक अध्यक्ष- राजमुद्रा युवा मंच) ,दशरथ बिरंगळ, पत्रकार धनराज पवार,भास्कर खेत्रे, कैलास खेत्रे, उध्दव आजबे, अशोक आजबे,श्रीधर सिध्देश्वर, तुकाराम गुळवे,अंगद बामदळे, मधुकर पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरासाठी १३४ रक्तदात्यांचे योगदान लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिपक सुरसे,किशोर काळे, किरण ओझर्डे,विशाल निमोणकर, अमोल निमोणकर,आदित्य साळुंके,चेतन घाडगे, बिपिन आखाडे,विकी ससाणे,रूद्रा काशिद,तेजस म्हेत्रे,गोरख म्हेत्रे, सिध्देश्वर निमोणकर,बाळु निमोणकर, आकाश टेकाळे, गणेश माने,बबलू राऊत,सुमित मोहळकर,बाळु जावळे, अनिल जावळे,अक्षय राळेभात, विशाल कांबळे, संग्राम मते, बाळासाहेब उबाळे बाळासाहेब जगदाळे, तुषार जगदाळे, तुषार फुलमाळी आदींनी परिश्रम घेतले.आभारप्रदर्शन संजय काशिद यांनी मानले.
विशेष म्हणजे शिवजयंती निमित्त या रक्तदान शिबीरासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम भगिनी यास्मिन बागवान यांनी रक्तदान केले.त्यांचे माहिला शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने कौतुक करण्यात आले.तसेच आम्रपाली गायसमुद्रे यांच्यासह
प्रविण निमोणकर (मेजर) , राजेश शर्मा( मेजर), मनोज इंगळे आदींनी रक्तदान करून सहकार्य केले.
या रक्तदान शिबीरासाठी अहमदनगर ब्लड बँक चे डाॅ.रामदास शेवाळे, संदीप हजारे, संजय मुळे, दिगंबर माळवे, सिध्दांत शेवाळे, धनश्री आरंगळे, सानिया पठाण,प्रिती ढोबळे,कोमल गव्हाळे आदींचे सहकार्य लाभले.



