बीड

क्रेन गटारीत फसला ; पाटोदा गरडाचे येथे गटारी चे काम निकृष्ट

क्रेन गटारीत फसला ; पाटोदा गरडाचे येथे गटारी चे काम निकृष्ट

निखिल कन्स्ट्रक्शनचे काम निकृष्ट दर्जाचे – गफ्फारभाई पठाण

जामखेड प्रतिनिधी:-जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे श्रीगोंदा – जामखेड राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम निखिल कन्स्ट्रक्शन, पुणे यांनी घेतले असून ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले आहे.अशी माहिती येथील माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी दिली आहे.

राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या शेजारी गटारीच्या कामात निकृष्ट दर्जाचा वापर झाल्याची बातमी आहे, भवरवाडी ला जाणारा रस्ता हा दुर्घटनेमुळे झाला आहे.
आज दिनांक १३ मार्च २०२५ रोजी क्रेन भवरवाडी येथे जात असताना जी गटार राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या कडेला बांधलेली होती.त्या गटारी वरून भवरवाडी येथे जात असताना क्रेन गटारी मध्ये फसला व मोठी दुर्घटना घडता घडता टळली.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले.तसेच निखिल कन्स्ट्रक्शन पुणे यांचे हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या भुयारी गटार योजनेच्या कामात ठेकेदाराने नियम पायदळी तुडवून काम केल्याचा आरोप आहे. या कामात निखिल कन्स्ट्रक्शन पुणे यांनी दखल घेत काम करावे.अन्यथा ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
अधिक माहिती:
काम सुरू झाल्यापासूनच तक्रारी:
भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरुवात झाल्यापासूनच नागरिकांकडून तक्रारी येत आहेत, कारण काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप आहे.
ठेकेदारावर आरोप:
ठेकेदाराने शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन न करता काम केल्याचा आरोप आहे.
ग्रामस्थांची मागणी:
काही ग्रामस्थांनी गटार योजनेचे काम चांगल्या दर्जाचे करण्याची मागणी केली आहे, कारण निकृष्ट कामामुळे गटारातून पाणी योग्य प्रकारे वाहणार नाही, अशी भीती आहे.

Back to top button