बीड
बलभीम महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवितांचे अभिवाचन

बलभीम महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवितांचे अभिवाचन
बीड-प्रतिनिधी: येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दि.२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.संतोष उंदरे होते तर मंचावर मराठी विभागप्रमुख डाॅ. मनोहर सिरसाट, प्रा. महारूद्र जगताप, प्रा. संदीप परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर कुसुमाग्रज यांच्या कवितांचे अभिवाचन मराठी विभागातील डाॅ. सुनिता बोराडे, डाॅ. रामनाथ फुटाणे, प्रा. आकांक्षा सोनवणे, हिंदी विभागातील प्रो. डाॅ. अमोल पालकर यांनी केले.
याप्रसंगी प्राचार्य डाॅ.संतोष उंदरे आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले की, मराठी भाषेत लोकप्रिय साहित्य निर्मिती झाली असून कुसुमाग्रज यांनी साहित्याच्या विविध प्रकारांत लेखन करून मराठी साहित्यात मौलिक भर घातली आहे.
तत्पुर्वी मराठी विभागप्रमुख डाॅ. मनोहर सिरसाट यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकातून मांडली.
या समारंभाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. संदीप परदेशी यांनी केले.
या समारंभास डाॅ. राजेंद्र चौहान, डाॅ. ललिता राठोड यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व मराठी विषयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



